सकाळ डिजिटल टीम
आजकाल बहुतेक लोक पोटाशी संबंधित समस्यांनी त्रस्त आहेत.
चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे 'किडनी स्टोन' होताना दिसत आहे.
काही लोक म्हणतात की, बिअर प्यायल्याने पोटातील खडे (मुतखडा किंवा पित्ताशयाचे खडे) निघू शकतात.
बिअर पिल्याने खरोखरच खडे निघून जातात, की नाही ते जाणून घेऊया..
जास्त द्रवपदार्थ पिल्याने भरपूर लघवी होते. जर खड्याचा आकार 6 मिमी पेक्षा कमी असेल, तर तो लघवीसोबत बाहेर पडू शकतो.
जरी बिअर पिल्याने खडा बाहेर पडण्यास मदत होईल, अशी शक्यता फारच कमी आहे.
भरपूर पाणी पिणे हा लघवी करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे.
तथापि, पित्ताशयाचे खडे किंवा इतर कोणत्याही खड्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या. बिअर हा पर्याय नाही.