Aarti Badade
अनेकजण रात्रीचा भात पूर्णपणे बंद करतात. पण रात्री भात खाल्ल्यानेच वजन वाढतं, हा समज पूर्णपणे योग्य नाही. भातासोबत काय आणि किती खातो, हेही महत्त्वाचं आहे.
rice weight gain
sakal
भातामध्ये पिष्टमय पदार्थ आणि कार्बोहायड्रेट जास्त असतात. त्यामुळे रात्री भात खाताना त्यासोबत भाज्या, कडधान्य, सलाड आणि प्रोटीनचा समतोल ठेवणं गरजेचं आहे.
rice weight gain
sakal
रात्री भात पूर्णपणे बंद करण्याची गरज नाही. मात्र भाताचं प्रमाण नियंत्रित ठेवणं आणि त्यासोबत पौष्टिक पदार्थ घेणं महत्त्वाचं आहे.
rice weight gain
Sakal
रात्रीच्या जेवणानंतर शरीराची हालचाल तुलनेने कमी असते. त्यामुळे भात असो किंवा पोळी, जेवल्यानंतर लगेच झोपणं टाळा. शक्यतो झोपण्याच्या किमान २ तास आधी रात्रीचं जेवण करा.
rice weight gain
Sakal
रात्री भात खात असाल तर ताटात भाज्या, कडधान्य किंवा डाळ, सलाड आणि प्रोटीन यांचा समावेश करा. भरपूर तेल आणि जास्त मसालेदार पदार्थ शक्यतो टाळा.
rice weight gain
Sakal
रात्रीच्या जेवणानंतर १० ते २० मिनिटं हलकं चालणं फायदेशीर ठरू शकतं. यामुळे जेवणानंतरची हालचाल वाढण्यास मदत होते.
rice weight gain
Sakal
आहाराचं प्रमाण, ताटातील पदार्थ, जेवणाची वेळ आणि जेवल्यानंतरची हालचाल याकडे लक्ष देणं अधिक महत्त्वाचं आहे. योग्य प्रमाणात, संतुलित आहारासोबत रात्री भात खाऊ शकता.
rice weight gain
Sakal
How Is Soap Made
Sakal