Aarti Badade
आपण रोज वापरत असलेला साबण तयार करण्यासाठी तेल किंवा चरबी आणि अल्कली यांचा वापर केला जातो. या दोन्ही घटकांमध्ये होणाऱ्या रासायनिक अभिक्रियेला ‘सॅपोनिफिकेशन’ म्हणतात.
How Is Soap Made
Sakal
तेल किंवा चरबी आणि कॉस्टिक सोडा (सोडियम हायड्रॉक्साइड) एकत्र आल्यावर रासायनिक प्रक्रिया होते. या प्रक्रियेत साबण आणि ग्लिसरीन तयार होते.
How Is Soap Made
Sakal
घरच्या घरी साबण बनवण्यासाठी कॉस्टिक सोड्यासोबत थेट प्रयोग करण्याऐवजी तयार ग्लिसरीन सोप बेस वापरणे सोपे ठरते. यामध्ये आपल्या आवडीनुसार सुगंध आणि नैसर्गिक घटक मिसळता येतात.
How Is Soap Made
Sakal
ग्लिसरीन सोप बेस,लॅव्हेंडर किंवा बदामासारखं सुगंधी तेल,नैसर्गिक रंग,कडुनिंबाची पेस्ट किंवा अॅलोव्हेरा पेस्ट,साबणाचा साचा (मोल्ड)
How Is Soap Made
Sakal
सोप बेसचे छोटे तुकडे करून घ्या. डबल बॉयलर पद्धतीने तो मंद आचेवर हळूहळू वितळवून घ्या. बेस पूर्णपणे वितळल्यानंतर गॅस बंद करा.
How Is Soap Made
Sakal
वितळलेल्या बेसमध्ये कडुनिंबाची किंवा अॅलोव्हेराची पेस्ट, सुगंधी तेल किंवा नैसर्गिक रंग घाला. सर्व घटक व्यवस्थित एकजीव होईपर्यंत हलक्या हाताने मिश्रण करा.
तयार मिश्रण लगेच साबणाच्या साच्यात ओता. काही तास ते पूर्णपणे थंड होऊ द्या. साबण कडक झाल्यानंतर अलगद साच्यातून बाहेर काढा. तुमचा घरगुती ग्लिसरीन साबण तयार!
How Is Soap Made
Sakal
Benefits of Drinking Saffron Water
Sakal