शापित वार्ड! निवडणूक जिंकणाऱ्याचा होतो मृत्यू; या गावात कोणीच निवडणूक लढवत नाही

Shubham Banubakode

गावाची अनोखी चर्चा

राजस्थानमधील डीडवाना जिल्ह्यातील खुनखुना गाव सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. गावातील एका वार्डातून यंदा निवडणूक लढवण्यासाठी कोणीही तयार झालं नाही.

Khunkhuna

|

esakal

कोणता आहे हा वार्ड?

गावातील वार्ड क्रमांक ५ मध्ये ही परिस्थिती आहे. या वार्डातून निवडून आलेल्या पंचांना आपला कार्यकाळ पूर्ण करता आला नाही, अशी चर्चा गावात आहे.

Khunkhuna

|

esakal

२० वर्षांपासून प्रकार

गेल्या २० वर्षांत या वार्डातून निवडून आलेल्या चार पंचांच्या कुटुंबात अकाली मृत्यूच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण असल्याचं सांगितलं जातं.

Khunkhuna

|

esakal

आयुष्यातही अडचणी

या वार्डातील पाचव्या पंचाच्या वैवाहिक आयुष्यातही अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे या जागेवर निवडणूक लढवण्यास लोक नकार देत असल्याची चर्चा आहे.

Khunkhuna

|

esakal

जबाबदारी

सफी खान कोटवाल, बिलाल खान गरड़ेजी आणि रसूल खान कोटवाल यांच्यासह अनेकांनी वेगवेगळ्या काळात या वार्डाची जबाबदारी सांभाळली. मात्र, कोणालाही कार्यकाळ पूर्ण करता आला नाही

Khunkhuna

|

esakal

निधन

नवाब खान कोटवाल यांनाही आपला कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. त्यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत युसुफ खान मरोगी यांची पंच म्हणून निवड झाली होती.

Khunkhuna

|

esakal

वेगळंच कारण

गावाचे माजी सरपंच बाबू खान यांनी पंचाच्या मृत्यूमुळे लोक निवडणूक लढवण्यास तयार नसल्याचं सांगितलं. तसेच गाव शापित असल्याचेही ते म्हणाले.

Khunkhuna

|

esakal

अर्ज भरला, पण माघार

यंदा एका तरुणाने या जागेसाठी उमेदवारी अर्जही भरला होता. मात्र, घरच्यांनी विरोध केल्याने त्याने माघार घेतली.

Khunkhuna

|

esakal

१०० वर्षांपूर्वीचा विदर्भ कसा होता? ब्रिटिशांच्या गॅझेटिअर्समध्ये काय लिहिलयं?

Vidarbha history

|

esakal

हेही वाचा-