Mansi Khambe
तुटणारा तारा पाहताच अनेकजण लगेचच इच्छा मागतात. पण तुटणारा ताऱ्याकडे मागितलेली इच्छा खरंच पूर्ण होते का? तसेच तारे खरंच तुटतात का? याबाबत जाणून घ्या.
Shooting Star
ESakal
तुटणारा तारा म्हणेजच 'उल्का' खरंतर तारा नसून एक खगोलीय घटना आहे. चित्रपटांपासून ते दैनंदिन जीवनापर्यंत, तुटणाऱ्या तारा पाहून इच्छा मागण्याची एक मनोरंजक गोष्ट आहे.
Shooting Star
ESakal
इंग्रजीमध्ये ज्याला 'शूटिंग स्टार' म्हटले जाते, तो एक अवकाशातील लहान खडक किंवा धुळीचा कण असतो. हा कण पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतो, तेव्हा त्याच्या सभोवतालची हवा वेगाने तापते आणि आयनीकृत होते.
Shooting Star
ESakal
शूटिंग स्टार पृथ्वीच्या वातावरणात प्रति सेकंद अनेक किलोमीटरच्या वेगाने प्रवास करतात. यामुळेच आकाशात काही क्षणांसाठी एक चमकणारी रेषा दिसते, ज्यामुळे तारा तुटून पडत असल्याचे दिसते.
Shooting Star
ESakal
अनेक शूटिंग स्टार अत्यंत लहान असतात, काही वाळूच्या कणांच्या आकाराचे असतात, तर काही खूप जास्त वेगाने प्रवास करू शकतात.
Shooting Star
ESakal
खरे तारे सूर्याप्रमाणे, वायूचे अत्यंत मोठे आणि उष्ण गोळे आहेत. ते पृथ्वीपासून इतके दूर आहेत की त्यांचे तुटणे किंवा आपल्या वातावरणात पडणे अशक्य आहे.
Shooting Star
ESakal
वैज्ञानिक भाषेत, आकाशात दिसणाऱ्या या चमकेला उल्का म्हणतात. जर अवकाशाचा तो तुकडा वातावरणात पूर्णपणे जळून न जाता पृथ्वीच्या पृष्ठभागावर पोहोचला, तर त्याला उल्कापिंड (meteorite) म्हणतात.
Shooting Star
ESakal
म्हणजेच, उल्कापिंड ही अवकाशातील एक वस्तू आहे, उल्का (meteor) ही वातावरणात दिसणारी एक चमक आहे आणि उल्कापिंड (meteorite) हा जमिनीवर पोहोचणारा भाग आहे.
Shooting Star
ESakal
तुटणाऱ्या ताऱ्यांकडे पाहून इच्छा मागण्याची परंपरा प्राचीन ग्रीसपासून सुरु झाली. प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ टॉलेमी यांनी लिहिले की, कधीकधी देव पृथ्वीकडे पाहतात आणि त्यांना ताऱ्यांमधून एखादा तारा खाली येताना दिसू शकतो.
Shooting Star
ESakal
यामुळे असा विश्वास निर्माण झाला की, अशा दुर्मिळ क्षणी केलेल्या इच्छा देवांपर्यंत पोहोचू शकतात. कालांतराने, अशा समजुती वेगवेगळ्या स्वरूपात दिसून आल्या. मात्र हे सिद्ध करण्यासाठी कोणताही ठोस वैज्ञानिक पुरावा नाही.
Shooting Star
ESakal
Mosquitoes Taste
ESakal