Yashwant Kshirsagar
"कुत्र्याची शेपट वाकडी ती वाकडीच" ही म्हण तुम्ही ऐकली असेल. पण तुम्हाला त्यामागील कारण वैज्ञानिक कारण माहित आहे का?
Why Dog Tail Curved
esakal
म्हणूनच ज्यांचा स्वभाव बदलत नाही अशा लोकांचे वर्णन करण्यासाठी 'कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच' अशी म्हण वापरली जाते.
Why Dog Tail Curved
esakal
पण कुत्र्याची शेपटी सरळ नाही तर वाकडीच का राहते हा खरा तर मनोरंजक तितका जिज्ञासू प्रश्न आहे.
Why Dog Tail Curved
esakal
प्रत्येक कुत्र्याची शेपटी ही वाकडी नसते. कुत्र्याची शेपटी वाकडी असेल की नाही हे त्याच्या जातीवर आणि जनुकीय बदलांवर अवलंबून असते.
Why Dog Tail Curved
esakal
कुत्र्यांच्या वाकड्या शेपट्या त्यांच्या उत्क्रांतीदरम्यान त्यांच्या गरजांमुळे विकसित झाल्या. अनेक तज्ञांचा असा विश्वास आहे की थंड प्रदेशात राहणाऱ्या कुत्र्यांच्या पूर्वजांना अनेकदा त्यांच्या शेपट्या वाकड्या ठेवाव्या लागत होत्या.
Why Dog Tail Curved
esakal
ही कुत्री अनेकदा विश्रांती घेत असत, त्यांना उबदार ठेवण्यासाठी त्यांच्या शेपटीला नाकावर ठेवत असत त्यांच्या शेपटीला वळवण्याची ही सवय कायमची बनली.
Why Dog Tail Curved
esakal
कुत्र्याची शेपटी सरळ करता येते का? असा प्रश्न उद्धवतो. कुत्र्याची शेपटी सरळ करण्यासाठी अनेक शस्त्रक्रिया उपलब्ध आहेत.
Why Dog Tail Curved
esakal
पण असे म्हटले जाते की, अशा प्रकारे कुत्र्याची शेपटी सरळ करणे कुत्र्याच्या आरोग्यासाठी चांगले नाही. कुत्र्याची शेपटी सरळ केल्याने अनेक प्रश्न निर्माण होतात
Why Dog Tail Curved
esakal
कुत्र्याची शेपटी सरळ केल्याने अनेक प्रश्न निर्माण होतात. या शस्त्रक्रियेमध्ये, सर्जन कुत्र्याची हाडे तोडतात आणि त्यांची पुनर्रचना करतात, ज्यामुळे कुत्र्याला खूप वेदना होतात. याचा त्याच्या आरोग्यावरही नकारात्मक परिणाम होतो
Why Dog Tail Curved
esakal
सरळ शेपटी असलेल्या अनेक कुत्र्यांच्या जाती आहेत. अशा कुत्र्यांमध्ये सरळ शेपटी असणे नैसर्गिक आहे आणि हे कोणत्याही विकाराचे लक्षण नाही.
Why Dog Tail Curved
esakal
जगात अशा अनेक कुत्र्यांच्या अशा काही जाती आहेत ज्यांना शेपटी अजिबात नसते. यामध्ये फ्रेंच बुलडॉग, बोस्टन टेरियर आणि वेल्श कॉर्गी यांचा समावेश आहे.
Why Dog Tail Curved
esakal
How Snakes Hear
esakal