संतोष कानडे
पूर्वी ग्रामीण भागात प्रत्येकाच्या घरात मांजर पाळलं जात असे. आजकाल शहरात मांजर पाळणं तसं फारच कमी झालंय. पण याच मांजराबद्दल एक रंजक गोष्ट जाणून घेऊया.
मांजरी शांत असतात तेव्हा त्या शरीरातून एक विशिष्ट प्रकारचा घरघर आवाज काढतात, तो आवाज माणसाच्या आरोग्यासाठी एक नैसर्गिक 'हिलिंग थेरपी'सारखा काम करतो.
शास्त्रज्ञ सांगतात की, मांजरीच्या घरघर करण्याचा आवाज २० ते १४० हर्ट्झ या वारंवारतेवर असतो. हीच ती फ्रीक्वेन्सी आहे जी वैद्यकीय क्षेत्रात जखमा भरण्यासाठी आणि उपचारांसाठी वापरली जाते.
याशिवाय जेव्हा आपण मांजराला जवळ घेतो आणि तिचा आवाज ऐकतो तेव्हा माणसाच्या शरीरात 'एन्डोर्फिन' आणि 'ऑक्सिटोसिन' हे आनंदी संप्रेरक तयार होतात.
मांजरीच्या कुशीत बसून तिचा हा संथ आवाज ऐकल्याने माणसाची हृदयस्पंदनं शांत होतात आणि हाय ब्लड प्रेशरच्या रुग्णांचा रक्तादाब वेगाने नियंत्रित होण्यास मदत होते.
युनिव्हर्सिटी ऑफ मिनेसोटाच्या एका मोठ्या संशोधनानुसार, मांजर पाळणाऱ्या लोकांमध्ये आणि त्यांच्या जवळ राहणाऱ्यांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका इतरांच्या तुलनेत ४० टक्क्यांनी कमी असतो.
तसेच मांजराच्या आवाजाने हाडे मजबुत होण्यास मदत होते, फ्रॅक्चर झालेली हाडे जोडण्यास मदत होते.. याचं कारण २० ते ५० हर्ट्झची कंपनं
सांधेदुखी, स्नायूचा कडपणा, शरीरावरील सूज, झोप न येणे यावरही मांजराचा सहवास गुणकारी आहे. मालकाचे आजार दूर करण्यासाठी मांजर काय काय करत असते, हे आपल्याला माहिती नाही.