Shubham Banubakode
गाढव म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर लगेच मूर्ख किंवा हट्टी प्राणी येतो. पण विज्ञानानुसार त्याची बुद्धिमत्ता यापेक्षा खूप वेगळी आहे.
donkey intelligence
esakal
गाढवाला धोका जाणवला की ते लगेच पुढे धावत नाही. आधी आजूबाजूची परिस्थिती पाहतं आणि मग पुढे जायचं ठरवतं.
donkey intelligence
esakal
गाढव एखाद्या ठिकाणी अचानक थांबला तर आपण त्याला हट्टी म्हणतो. प्रत्यक्षात ते रस्ता सुरक्षित आहे की नाही, हे तपासतो.
donkey intelligence
esakal
घाबरलेला घोडा अनेकदा विचार न करता पळू शकतो. गाढव मात्र थांबून परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करतो, असं तज्ज्ञांचं निरीक्षण आहे.
donkey intelligence
esakal
गाढव अनेक वर्षांपर्यंत ठिकाणं, रस्ते आणि इतर प्राणी लक्षात ठेवू शकतो. त्यामुळे बदलत्या परिस्थितीत जुळवून घेणं त्याला सोपं जातं.
donkey intelligence
esakal
डोंगराळ किंवा खडतर भागातून जाताना गाढव सुरक्षित वाटणारा रस्ता आणि उतार निवडण्याला प्राधान्य देतो. हा त्याच्या नैसर्गिक कौशल्याचा भाग असतो.
donkey intelligence
esakal
गाढव शांतपणे कठीण काम आणि मोठं ओझं सहन करतो. त्याचा संयम आणि सहनशक्ती अनेकदा माणसांनी बुद्धी कमी असल्याचं लक्षण मानलं.
donkey intelligence
esakal
पिढ्यान्पिढ्या ‘गाढव’ हा शब्द मूर्खपणासाठी वापरला गेला. मात्र त्याची सावधगिरी, स्मरणशक्ती आणि सहनशक्ती वेगळ्या बुद्धिमत्तेची चिन्हं आहेत.
donkey intelligence
esakal
upi
esakal