Shubham Banubakode
आज चहाच्या टपरीपासून मोठ्या दुकानापर्यंत कुठेही QR कोड स्कॅन करून पैसे देता येतात. या सोप्या व्यवहारामागे UPI ची मोठी भूमिका आहे.
how UPI started
esakal
UPI चं पहिलं व्हर्जन २०१५ मध्ये NPCI ने सुरू केलं होतं. त्यामागे RBI आणि देशातील अनेक प्रमुख बँकांचंही महत्त्वाची भूमिका बजावली होती.
how UPI started
esakal
UPI ची प्रत्यक्ष सुरुवात २०१५ मध्ये झाली असली तरी या कल्पनेवर २०१२ पासून काम सुरु करण्यात आलं होतं.
how UPI started
esakal
मोबाइल वॉलेटशिवाय थेट बँक खात्यातून पैसे पाठवता यावेत, अशी गरज लक्षात घेऊन नंदन नीलेकणी यांनी या संकल्पनेला दिशा दिली.
how UPI started
esakal
डिजिटल पेमेंटसाठी देशव्यापी व्यवस्था उभी करण्यासाठी नीलेकणी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या प्रयत्नांमुळे बँका आणि संबंधित संस्था एकत्र आल्या.
how UPI started
esakal
UPI तयार करण्याची मुख्य जबाबदारी NPCI कडे होती. नीलेकणी हे NPCI चे चेअरमन होते. त्यांनी वेगवेगळ्या बँकांना एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणलं.
how UPI started
esakal
UPI मुळे पैसे पाठवताना बँक खाते क्रमांक किंवा IFSC कोड लक्षात ठेवण्याची गरज कमी झाली. मोबाइलवरून काही सेकंदांत व्यवहार होऊ लागला.
how UPI started
esakal
नंदन नीलेकणी हे Infosys चे सहसंस्थापक असून त्यांनी UIDAI चे अध्यक्ष म्हणूनही काम केलं. आधार आणि डिजिटल व्यवस्थेत त्यांचं योगदान महत्त्वाचं आहे.
how UPI started
esakal
सोपं पेमेंट, QR कोड आणि मोबाइलचा वाढता वापर यामुळे UPI झपाट्याने लोकप्रिय झालं. आज छोट्या व्यवहारांपासून मोठ्या पेमेंटपर्यंत त्याचा वापर होतो.
how UPI started
esakal
railway
esakal