बाळकृष्ण मधाळे
असे नेहमीच सांगितले जाते, की शिकण्यासाठी वयाची कोणतीही मर्यादा नसते. आपल्या पूर्वजांनीही हेच शिकवले आहे की ज्ञान जिथे मिळेल, तिथून ते आत्मसात केले पाहिजे.
chanakya success tips in daily life
esakal
याच संदर्भात आचार्य चाणक्य यांनी एका श्लोकाद्वारे गाढवाकडून शिकण्यासारखे काही महत्त्वाचे गुण सांगितले आहेत.
chanakya success tips in daily life
esakal
हे गुण आपल्या आयुष्यात अंगीकारले, तर यश निश्चितच आपल्या वाट्याला येऊ शकते.
chanakya success tips in daily life
esakal
सर्वप्रथम, आपल्याकडे जे आहे त्यात समाधान मानणे अत्यंत गरजेचे आहे. इतरांशी सतत तुलना करत राहणे किंवा स्पर्धेच्या अतिरेकात अडकणे टाळले पाहिजे. लोभाला कधीही मनावर राज्य करू देऊ नये.
chanakya success tips in daily life
esakal
दुसरा महत्त्वाचा गुण म्हणजे, मेहनत आणि चिकाटी. गाढव कितीही थकलेले असले तरी ते आपले ओझे प्रामाणिकपणे वाहत राहते. त्याचप्रमाणे माणसानेही कोणत्याही प्रकारचा आळस न करता आपले काम पूर्ण समर्पणाने केले पाहिजे.
chanakya success tips in daily life
esakal
तिसरा गुण म्हणजे, परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता. गाढव उष्णता असो किंवा थंडी, प्रत्येक वातावरणात स्वतःला सहज जुळवून घेते. आपणही बदलत्या परिस्थितीत खचून न जाता त्यानुसार स्वतःला तयार केले पाहिजे.
chanakya success tips in daily life
esakal
खरं तर, जो व्यक्ती आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर येणाऱ्या आव्हानांना धैर्याने सामोरे जातो आणि सातत्याने प्रयत्न करत राहतो, त्याच्याच पायाशी यश येऊन लोळण घेते.
chanakya success tips in daily life
esakal
Shahu Maharaj era governance Konkan history
esakal