सकाळ डिजिटल टीम
खऱ्या हापूस आंब्याला नैसर्गिक गोडसर सुगंध असतो, जो दूरवरून जाणवतो. रासायनिक पद्धतीने पिकवलेले आंबे मात्र वासही देत नाहीत!
नैसर्गिक हापूस थोडासा मऊसर व मुलायम जाणवतो. रासायनिक आंबे मात्र बाहेरून पिवळे असले तरी घट्ट आणि कठीण असतात.
खरा हापूस थोडासा फिकट हिरवट-पिवळसर असतो. रासायनिक आंब्याचा रंग मात्र पूर्ण एकसारखा, गडद पिवळा दिसतो.
पिकलेल्या हापूसची साल सहज सुटते आणि गऱ्यावर चिकटत नाही.
हापूसचा गर केशरी रंगाचा, गोडसर, तोंडात विरघळणारा असतो. गर आणि वासाच्या एकत्र अनुभूतीवरून 'खरा हापूस' लगेच समजतो!
एका भांड्यात पाणी घेऊन आंबा बुडवा, जर बुडाला, तर नैसर्गिक पिकलेला. जर तरंगत राहिला, तर रासायनिक पद्धतीने पिकवलेला असण्याची शक्यता!
कधी कधी आंबा कुठून आलेला आहे, हे वापरलेल्या वर्तमानपत्रावरूनही कळू शकतं. कोकणातील आंबा बहुतेक वेळा स्थानिक वर्तमानपत्रात गुंडाळलेला असतो.