'ब्रेन ट्यूमर'ची सुरुवातीची 'ही' 6 लक्षणे दिसताच व्हा सावध!

Aarti Badade

डोकेदुखीकडे दुर्लक्ष पडेल महागात

नेहमीची डोकेदुखी समजून दुर्लक्ष करणे घातक ठरू शकते, कारण हे ब्रेन ट्यूमरसारख्या गंभीर आजाराचे लक्षण असू शकते.

Brain tumor symptoms

|

sakal

दृष्टी अंधुक होणे किंवा बदलणे

ट्यूमरमुळे मेंदूतील 'ओसीपीटल' भागावर दाब येतो, परिणामी समोरच्या वस्तू अंधुक दिसू लागतात किंवा दृष्टीवर गंभीर परिणाम होतो.

Brain tumor symptoms

|

Sakal

वागण्यात बदल आणि विसरभोळेपणा

'फ्रंटल लोब'मध्ये ट्यूमर असल्यास व्यक्तीची विनाकारण चिडचिड होते, स्वभाव बदलतो आणि गोष्टी वारंवार विसरायला होतात.

Brain tumor symptoms

|

Sakal

चालताना तोल जाणे किंवा अडखळणे

मेंदूच्या 'सेरेबेलम' भागातील ट्यूमरमुळे चालताना सतत चक्कर येते, पाय अडखळतात आणि शरीराचा तोल सांभाळणे कठीण होते.

Brain tumor symptoms

|

Sakal

अचानक झटके येणे किंवा चक्कर येणे

ट्यूमरमुळे न्यूरॉन्स अचानक सक्रिय होतात, ज्यामुळे कोणत्याही कारणाशिवाय फिट्स येणे, झटके लागणे किंवा शुद्ध हरपण्याचे प्रकार घडू शकतात.

Brain tumor symptoms

|

Sakal

शरीराचा एखादा भाग सुन्न होणे

शरीराच्या एका बाजूला प्रचंड अशक्तपणा जाणवणे, तोंड सुन्न होणे किंवा बोलताना शब्द अडखळणे ही ट्यूमरची धोक्याची चिन्हे आहेत.

Brain tumor symptoms

|

sakal

मळमळ आणि ऐकू येण्यास त्रास

जर तुम्हाला बराच काळ विनाकारण मळमळणे, उलट्या होणे किंवा ऐकू येण्याची क्षमता कमी होणे असा त्रास होत असेल, तर त्वरित डॉक्टरांना भेटा.

Brain tumor symptoms

|

sakal

गोड खाल्ल्याने हार्ट अटॅक येतो का?

Sugar cause heart attack

|

Sakal

येथे क्लिक करा