टाचा दुखण्याकडे करू नका दुर्लक्ष; शरीर देत असू शकते 'या' गंभीर समस्यांचे संकेत!

Aarti Badade

टाचांमध्ये तीव्र वेदना

सकाळी उठल्याबरोबर पायाच्या टाचांमध्ये तीव्र वेदना जाणवणे हे फक्त थकव्यामुळे नसून गंभीर आरोग्य समस्येचे लक्षण असू शकते.

Heel pain causes in the morning

|

Sakal

रोज होणाऱ्या टाचदुखीकडे दुर्लक्ष

जर तुम्हाला दररोज सकाळी टाचा दुखण्याचा त्रास होत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात मोठ्या आजारांना सामोरे जावे लागू शकते.

Heel pain causes in the morning

|

Sakal

'प्लांटार फॅसायटिस' असण्याची शक्यता

वैद्यकीय क्षेत्रात सकाळी उठल्यावर होणाऱ्या टाचदुखीचे मुख्य कारण 'प्लांटार फॅसायटिस' (Plantar Fasciitis) नावाचा आजार मानले जाते.

Heel pain causes in the morning

|

Sakal

एकाच जागी बराच वेळ उभे

ज्या लोकांचे काम सलग उभे राहण्याचे असते, त्यांच्या पायाच्या स्नायूंवर जास्त ताण आल्यामुळे ही समस्या अधिक प्रमाणात आढळते.

Heel pain causes in the morning

|

Sakal

शरीरात व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम

हडांच्या मजबुतीसाठी आवश्यक असलेले व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम शरीरात कमी झाल्यास टाचांमध्ये असह्य वेदना सुरू होतात.

Heel pain causes in the morning

|

Sakal

मधुमेह रुग्णांना होतो टाचदुखीचा त्रास

रक्तातील साखर वाढल्यामुळे नसा कमजोर होतात, परिणामी मधुमेही रुग्णांना सकाळी टाचा दुखण्याचा त्रास मोठ्या प्रमाणावर जाणवतो.

Heel pain causes in the morning

|

Sakal

डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक

घरगुती उपायांवर अवलंबून राहण्याऐवजी डॉक्टरांकडून योग्य तपासणी करून घेऊन वेदनेचे मूळ कारण शोधणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

Heel pain causes in the morning

|

Sakal

योग्य आहार आणि वजन

शरीराचे वजन नियंत्रित ठेवणे, कॅल्शियमयुक्त आहार घेणे आणि पायांना पुरेशी विश्रांती देणे यांमुळे टाचदुखीपासून आराम मिळतो.

Heel pain causes in the morning

|

Sakal

मधुमेह नियंत्रणासाठी चालण्याची ही सवय अन् वेळ ठरू शकते गेमचेंजर

Post meal walk diabetes control

|

Sakal

येथे क्लिक करा