Aarti Badade
रक्तवाहिन्यांमधील रक्ताचा दाब सामान्यपेक्षा कमी होतो,त्याला 'लो बीपी' किंवा हायपोटेन्शन म्हणतात. शरीरातील महत्त्वाच्या अवयवांना रक्ताचा पुरवठा कमी होतो, जे धोक्याचे ठरू शकते.
Symptoms of Low Blood Pressure
sakal
डिहायड्रेशनमुळे रक्ताचे प्रमाण कमी होते. शरीरात पुरेसे पाणी किंवा इलेक्ट्रोलाइट्स नसल्यास रक्तदाब अचानक खाली पडतो. त्यामुळे भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे.
Symptoms of Low Blood Pressure
Sakal
तुमच्या आहारात व्हिटॅमिन बी-१२, फोलेट आणि लोहाची कमतरता असल्यास लाल रक्तपेशी कमी होतात. यामुळे येणाऱ्या अशक्तपणामुळे बीपी लो होण्याची समस्या वारंवार उद्भवू शकते.
Symptoms of Low Blood Pressure
Sakal
उच्च रक्तदाबाची औषधे, हृदयरोग किंवा थायरॉईडच्या समस्यांमुळेही बीपी अचानक लो होऊ शकतो. अशा वेळी औषधांच्या डोसबाबत डॉक्टरांशी चर्चा करणे गरजेचे आहे.
Symptoms of Low Blood Pressure
sakal
बीपी लो झाल्यावर लगेच एका ग्लास पाण्यात थोडे मीठ टाकून प्या. मीठामध्ये सोडियम असते, जे रक्तदाब वाढवून तो त्वरित नियंत्रित करण्यास मदत करते.
Symptoms of Low Blood Pressure
Sakal
अचानक बीपी कमी झाल्यावर एक कप कडक कॉफी पिणे खूप फायदेशीर ठरते. कॉफीमधील कॅफिनमुळे रक्तदाब त्वरित वाढण्यास मदत होते. हे स्टार्टर म्हणून उत्तम काम करते.
Symptoms of Low Blood Pressure
Sakal
कोमट दूध पिल्यानेही बीपी नियंत्रणात येतो. दुधामध्ये कॅल्शियम आणि ओमेगा फॅट्स असतात, जे रक्तवाहिन्यांसाठी उपयुक्त असतात. अस्वस्थ वाटल्यास शांत बसून कोमट दूध प्यावे.
Symptoms of Low Blood Pressure
sakal
जर लो बीपीमुळे वारंवार चक्कर येत असेल, डोळ्यासमोर अंधारी येत असेल किंवा शुद्ध हरपत असेल, तर घरगुती उपायांवर अवलंबून न राहता त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.
Symptoms of Low Blood Pressure
Sakal
Diabetics Eat Fresh Coconut
Sakal