हाय BP असण्याचे 'हे' 5 संकेत दुर्लक्ष करू नका!

Aarti Badade

उच्च रक्तदाब - एक सायलेंट किलर

धावपळीच्या जीवनात उच्च रक्तदाब (High BP) ही एक गंभीर समस्या बनली आहे. वेळेवर लक्षणे ओळखल्यास हृदयविकाराचा धोका टाळता येऊ शकतो.

High blood pressure symptoms

|

Sakal

तीव्र डोकेदुखीचा त्रास

सकाळी उठल्यावर वारंवार तीव्र डोकेदुखी होणे, विशेषतः डोक्याच्या मागील बाजूस वेदना जाणवणे, हे हाय बीपीचे प्राथमिक लक्षण असू शकते.

High blood pressure symptoms

|

Sakal

श्वास घेण्यास अडथळा आणि थकवा

सामान्य हालचाली करताना किंवा काम करताना वारंवार श्वास घेण्यास त्रास होणे आणि सतत थकवा जाणवणे हे रक्तदाब वाढल्याचे संकेत आहेत.

High blood pressure symptoms

|

Sakal

चक्कर येणे आणि अस्थिरता

वारंवार चक्कर येणे किंवा भोवळ आल्यासारखे वाटणे हाय बीपीमुळे होऊ शकते. अशा वेळी शरीर हायड्रेट ठेवणे आणि डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

High blood pressure symptoms

|

Sakal

दृष्टी अंधुक होणे

उच्च रक्तदाबामुळे डोळ्यांतील नाजूक रक्तवाहिन्यांचे नुकसान होऊ शकते. यामुळे दृष्टी अस्पष्ट होणे किंवा रेटिनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.

High blood pressure symptoms

|

Sakal

छातीत वेदना आणि धडधड

छाती जड वाटणे किंवा ठोके चुकल्यासारखे वाटणे हे हृदयावरील ताणाचे लक्षण आहे. मानसिक चलबिचल आणि तणाव कमी केल्यास आराम मिळू शकतो.

High blood pressure symptoms

|

Sakal

अचानक वजन वाढणे

वजन वाढल्यामुळे रक्तवाहिन्यांवर अतिरिक्त ताण पडतो, ज्यामुळे रक्तदाब वाढतो. अचानक वजन वाढल्यास बीपीची तपासणी करून घेणे हिताचे ठरेल.

High blood pressure symptoms

|

Sakal

शरीरातील युरिक ऍसिड कमी करण्यासाठी करा 'हे' सोपे बदल!

Natural ways to reduce uric acid

|

Sakal

येथे क्लिक करा