Aarti Badade
जास्त वजन एकदा वाढलं की ते कमी करणं कठीण होऊ शकतं. पण सुरुवातीच्या लक्षणांवर लक्ष ठेवून, लठ्ठपणा वाढण्यापासून रोखता येऊ शकतो.
पोटाच्या भागात किंवा कंबरेभोवती चरबी वाढल्यास, ते वजन वाढण्याचे संकेत असू शकतात. जर तुम्हाला कंबरेच्या भागात वजन वाढतंय असे दिसले, तर वजन कमी करायला सुरुवात करा.
चांगली झोप आणि संतुलित आहार घेतल्यानंतरही सतत थकवा जाणवत असल्यास, ते लठ्ठपणाच्या वाढीचं लक्षण होऊ शकते. हे शरीरातील बदलाचा इशारा आहे की वजन कमी करण्याची आवश्यकता आहे.
माने किंवा छातीभोवती चरबी वाढल्यास श्वास घेण्यात अडचण येऊ शकते, ज्यामुळे घोरण्याची समस्या निर्माण होते. यावर उपाय शोधणे आणि वजन कमी करणे आवश्यक आहे.
वजन वाढल्यामुळे खासकरून गुडघे, कंबर आणि पाठीच्या खालच्या भागात अधिक दबाव येतो, ज्यामुळे सांधेदुखी होऊ शकते.नियमित व्यायाम आणि संतुलित आहाराद्वारे यावर नियंत्रण मिळवू शकता.
वजन वाढल्याने हार्मोनल असंतुलन होऊ शकतं, ज्यामुळे बारंबार भूक लागते. जेवल्यानंतर देखील खाण्याची इच्छा होत असल्यास, वजन कमी करायला सुरुवात करा.
लठ्ठपणा वाढण्याची लक्षणं दिसत असताना, प्रक्रिया केलेले पदार्थ आणि साखरेचे सेवन कमी करा.निरोगी आहार आणि नियमित व्यायाम जीवनशैलीचा भाग बनवा.
लठ्ठपणा वाढण्याची लक्षणं दिसल्यास, त्यावर त्वरित नियंत्रण ठेवण्याचे महत्त्वाचे आहे. समतोल आहार आणि सक्रिय जीवनशैली तुमच्या आरोग्याला समर्थन देईल.