साखर नियंत्रणात राहील 'हा' रस रोज सकाळी प्यायला विसरू नका!

Aarti Badade

मधुमेह नियंत्रणात ठेवतो

कोहळ्याच्या रसात मधुमेहविरोधी गुणधर्म असतात. दररोज रिकाम्या पोटी प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.

kohla juice benefits | Sakal

वजन कमी करण्यास मदत

कोहळ्यात फायबर भरपूर असल्यामुळे त्याचा रस पिल्यास पोट भरलेले राहते, आणि जास्त खाणे टाळता येते.

kohla juice benefits | Sakal

त्वचेसाठी फायदेशीर

महिनाभर दररोज सकाळी रिकाम्या पोटी कोहळ्याचा रस प्यायल्यास त्वचा स्वच्छ, हायड्रेटेड आणि निरोगी राहते.

kohla juice benefits | Sakal

हृदयाचे आरोग्य राखतो

कोहळ्याचा रस कोलेस्टेरॉल कमी करतो आणि लिपिड्स नियंत्रित ठेवतो. त्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते.

kohla juice benefits | Sakal

रक्ताभिसरण सुधारतो

कोहळ्याचा रस लोहाची कमतरता भरून काढतो आणि रक्ताभिसरण सुधारतो. त्यामुळे शरीरात ऊर्जा वाढते.

kohla juice benefits | Sakal

शरीराला थंडावा देतो

कोहळ्याचा रस शरीराचे तापमान नियंत्रित ठेवतो. विशेषतः पेप्टिक अल्सरच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे.

kohla juice benefits | Sakal

मेंदूच्या कार्यक्षमतेत वाढ

रसातील पोषक घटक मेंदूच्या कार्यक्षमतेत सुधारणा करतात व डिमेंशियाचा धोका कमी करतात.

kohla juice benefits | Sakal

कमी कॅलरीज आणि कमी कार्बोहायड्रेट्स

कोहळ्याच्या रसात कॅलरीज व कार्बोहायड्रेट्स कमी असल्यामुळे तो आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे, विशेषतः वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी.

kohla juice benefits | Sakal

टीप

दररोज सकाळी रिकाम्या पोटी २००–२५० मि.ली. कोहळ्याचा रस प्यावा. कोणतेही आजार असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

kohla juice benefits | Sakal

'हे' सुपरफूड खा अन् त्वचेवर नॅचरल ग्लो आणा!

Glowing Skin superfoods | sakal
येथे क्लिक करा