Aarti Badade
वय जसजसं वाढतं, तसतसे त्याचे परिणाम त्वचेवर दिसू लागतात – सुरकुत्या, बारीक रेषा, कोरडी आणि थकलेली त्वचा. मात्र काही विशिष्ट पदार्थ आहारात घेतल्यास त्वचा दीर्घकाळ तरुण, घट्ट आणि तजेलदार राहू शकते.
एवोकॅडोमध्ये भरपूर अँटिऑक्सिडंट्स, हेल्दी फॅट्स आणि जीवनसत्त्वे असतात. ते त्वचेला मॉइश्चरायझ करतं, सुरकुत्या कमी करतं आणि त्वचेची लवचिकता टिकवण्यात मदत करतं.
एवोकॅडो तेल हे त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. यामुळे त्वचा घट्ट राहते, कोरडेपणा कमी होतो आणि वृद्धत्वाची लक्षणे उशिरा दिसू लागतात.
संत्रं, मोसंबी, लिंबू यांसारखी फळे शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवतात आणि त्वचेसाठी फायदेशीर असलेल्या कोलेजनचे प्रमाण वाढवतात. यामुळे त्वचा उजळते, सुरकुत्या कमी होतात आणि पिग्मेंटेशन दूर राहतो.
पालक, मेथी, कोथिंबीर यांसारख्या हिरव्या भाज्यांमध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात, जे त्वचेला हायड्रेट ठेवतात आणि नैसर्गिक पोषण देतात. यामुळे त्वचा अधिक तरुण आणि तजेलदार दिसते.
सफरचंद, बेरी, डाळिंब यांसारख्या फळांमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे असतात, जे त्वचेचा पोत सुधारतात. यामुळे त्वचा कोमल, निरोगी आणि चमकदार राहते.
वय वाढतानाही सौंदर्य टिकवण्यासाठी आहारामध्ये या नैसर्गिक पदार्थांचा समावेश करावा.
केमिकलयुक्त सौंदर्यप्रसाधनांपेक्षा हे पर्याय अधिक सुरक्षित आणि परिणामकारक असतात.
वरील माहिती ही सर्वसाधारण आरोग्यविषयक आहे.
कोणतेही पूरक पदार्थ किंवा आहारातील बदल करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.