Saisimran Ghashi
तुमच्याकडे किती पैसा आहे हे कधीही नातेवाईकांना सांगू नये, कारण यामुळे फसवणूक किंवा द्वेष निर्माण होऊ शकतो.
कर्ज किंवा आर्थिक समस्यांबद्दल कोणाला सांगितल्याने तुमची प्रतिमा खराब होऊ शकते.
कौटुंबिक वाद-विवाद बाहेर सांगितल्यास कुटुंबाची प्रतिष्ठा कमी होऊ शकते.
तुमचे अपयश इतरांना सांगितल्याने लोक तुमची थट्टा करू शकतात किंवा तुमचा गैरफायदा घेऊ शकतात.
तुमच्या भविष्यातील योजना किंवा रणनीती उघड केल्यास इतर त्याचा गैरलाभ घेऊ शकतात.
तुमच्या कमजोरीबद्दल सांगितल्याने लोक तुमच्यावर हावी होण्याचा प्रयत्न करू शकतात.
कुटुंबातील खासगी बाबी उघड केल्याने विश्वास आणि सन्मान कमी होऊ शकतो.
आर्थिक किंवा अन्य नुकसान सांगितल्याने लोक तुम्हाला कमकुवत समजू शकतात.
तुम्हाला कोणी फसवले असल्यास ती माहिती गुप्त ठेवा, अन्यथा तुमची प्रतिमा मलिन होऊ शकते.
तुमचे भावनिक दु:ख इतरांना सांगितल्याने सहानुभूतीऐवजी उपहास होण्याची शक्यता असते.