8 आठवड्यात वजन दुप्पट होईल कमी! 'या' पदार्थांवर लक्ष केंद्रित करा

Aarti Badade

वजन कमी करण्याचे नवीन रहस्य

आजकाल अनेकजण वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत, पण फक्त कॅलरीज किंवा कार्ब्स मोजून फायदा होत नाही. एका नवीन संशोधनानुसार खरा फरक अन्नाच्या प्रक्रिया पातळीवर आहे.

Weight Loss Tips

|

Sakal

संशोधनातून मोठा खुलासा

एका अभ्यासात सहभागी झालेल्या लोकांना ८ आठवड्यांसाठी दोन प्रकारचे आहार देण्यात आले: १. कमी प्रक्रिया केलेले अन्न (ओट्स, भाज्या) आणि २. जास्त प्रक्रिया केलेले अन्न (पॅकेज केलेले स्नॅक्स).

Weight Loss Tips

|

Sakal

वजन कमी होण्याचा वेग दुप्पट

ज्यांनी कमी प्रक्रिया केलेले अन्न खाल्ले, त्यांचे वजन सुमारे २% कमी झाले. तर, जास्त प्रक्रिया केलेले अन्न खाणाऱ्यांचे वजन फक्त १% कमी झाले. म्हणजेच, वेग जवळपास दुप्पट होता!

Weight Loss Tips

|

Sakal

प्रक्रिया केलेले अन्न आणि भूक

जास्त प्रक्रिया केलेले अन्न लवकर खाल्ले जाते, त्यात कॅलरीज जास्त असतात आणि ते भूक वाढवतात. यामुळे तुमचे वजन कमी होण्यास अडथळा येतो.

Weight Loss Tips

|

Sakal

कमी प्रक्रिया केलेले अन्न फायदेशीर

कमी प्रक्रिया केलेले अन्न (फळे, भाज्या, मासे) खाल्ल्यास तुमचे पोट जास्त काळ भरलेले राहते. यामुळे भूक आणि लालसेवर नियंत्रण येते.

Weight Loss Tips

|

Sakal

इतर आरोग्य फायदे

वजन कमी करण्यासोबतच, कमी प्रक्रिया केलेला आहार घेणाऱ्यांना अतिरिक्त चरबी कमी झाल्याचा, ट्रायग्लिसराइड्स कमी झाल्याचा आणि रक्तदाबात सुधारणा झाल्याचा अनुभव आला.

Weight Loss Tips

|

Sakal

आहारात 'हे' पदार्थ समाविष्ट करा

वजन झपाट्याने कमी करण्यासाठी तुमच्या आहारात नैसर्गिक आणि कमी प्रक्रिया केलेले पदार्थ समाविष्ट करा बीन्स,अंडी,दही,ओट्स,फळे,भाज्या

Weight Loss Tips

|

Sakal

कामाच्या धावपळीतही 'या' स्मूदीसह जपा तुमचे आरोग्य

Smoothie

|

sakal

येथे क्लिक करा