सकाळ डिजिटल टीम
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना बौद्ध भिक्खू प्रज्ञानंद (वय ९०) यांनी बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती.
प्रज्ञानंद यांच्यासह इतर सात बौद्ध भिक्खूंनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी बाबासाहेबांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती. दीक्षा देणाऱ्यांपैकी आता एकही जण हयात नाही.
प्रज्ञानंद यांचा जन्म श्रीलंकेत झाला होता. वयाच्या १३ व्या वर्षी ते लखनऊमध्ये आले. रिसालदार पार्कच्या आश्रमात ते गुरू बोधानंद यांना भेटले होते. नंतर ते येथेच राहिले.
बौद्ध भिक्खू प्रज्ञानंद यांचा जन्म श्रीलंकेत झाला होता. 1942 मध्ये प्रज्ञानंद भारतात आले.
महस्थवीर चंद्रमणी यांच्यासह 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूरमध्ये सात भिक्खूंनी डॉ. आंबेडकरांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती. यात भिक्खू प्रज्ञानंद यांचाही समावेश होता.
प्रज्ञानंद लखनऊच्या रिसालदार पार्कमधील बुद्ध विहारात राहतात. बाबासाहेबांनी या बुद्ध विहाराला दोन वेळा भेट दिली होती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्म सोडून बौद्ध धम्माचा स्वीकार केला होता.
1950 ते 1956 दरम्यान त्यांच्यावर काही बौद्ध भिक्खूंचा प्रभाव पडला आणि त्यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूरमध्ये आपल्या पत्नीसह, तसेच लाखो अनुयायांसह बौद्ध धम्म अंगीकरला.
सजवलेल्या पांढऱ्या शुभ्र घोड्यावर बसले होते डॉ. आंबेडकर; 'हा' दुर्मिळ फोटो पाहिलाय? कधी आणि कुठे काढला?