Yashwant Kshirsagar
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज देशभरात मोठ्या उत्साहाने साजरी होत होते महामानवाला वंदन करण्यासाठी लाखो लोक एकत्र येतात.
Solapur Dr. Ambedkar Memories
esakal
सोलापूरकरांनी बाबासाहेबांच्या भेटीच्या अमूल्य स्मृती आजही जपून ठेवल्या आहेत. १९३७ आणि १९४६ च्या दौऱ्यांच्या आठवणी आजही लोकांच्या मनात ताज्या आहेत.
Solapur Dr. Ambedkar Memories
esakal
डॉ. बाबासाहेब आंबेडकर १९३७ साली अक्कलकोट तालुक्यातील वळसंग गावी दौऱ्यावर आले होते. सोलापूर जिल्हा लोकल बोर्डाने बांधलेल्या विहिरीला भेट दिली.
Solapur Dr. Ambedkar Memories
esakal
गावकऱ्यांनी विनंती केल्यावर बाबासाहेबांनी रेशीमच्या दोरखंडाने चांदीच्या पेल्यातून विहिरीतून पाणी काढले. लोकांच्या प्रेमाखातर त्यांनी हे केले.
Solapur Dr. Ambedkar Memories
esakal
बाबासाहेबांनी स्वतः ते पाणी प्राशन केले. त्या दिवसापासून वळसंग गावातील हजारो नागरिक या विहिरीच्या पाण्याला अमृताहून अधिक महत्त्व देतात.
Solapur Dr. Ambedkar Memories
esakal
या विहिरीला 'आंबेडकर बावडी' असे नाव देण्यात आले आहे. भीम अनुयायी आजही या ठिकाणी दर्शनासाठी येतात. नुकताच प्रशासनाने यावर सुंदर डोमही बांधला आहे.
Solapur Dr. Ambedkar Memories
esakal
बाबासाहेब १४ जानेवारी १९४६ रोजी सोलापूर दौऱ्यावर होते. फॉरेस्ट भागातील गंगा निवास येथे त्यांनी मुक्काम केला.
Solapur Dr. Ambedkar Memories
esakal
गंगा निवास येथे बाबासाहेबांनी सकाळी नाश्ता केला. पसलेलू कुटुंबाने त्यावेळी वापरलेले ताट, ग्लास, वाटी, कप आजही अभिमानाने जपून ठेवले आहेत.
Solapur Dr. Ambedkar Memories
esakal
भीम अनुयायी मोठ्या श्रद्धेने गंगा निवासला भेट देतात. या ऐतिहासिक वस्तू पाहण्यासाठी लोक दूरदूरहून येतात.
Solapur Dr. Ambedkar Memories
esakal
Maharashtra Budget Tourist Places
esakal