Yashwant Kshirsagar
आज आपण 8 तासांची ड्युटी आणि ओव्हरटाईमचे फायदे घेतोय, पण यामागे असलेलं नाव म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर!
ब्रिटिश काळात 1942 साली बाबासाहेबांना ‘लेबर मेंबर’ म्हणून नियुक्त केलं गेलं. हेच पद त्यांनी कामगारांच्या हक्कांसाठी वापरलं.
त्यांनीच सर्वप्रथम 8 तास काम, 8 तास विश्रांती आणि 8 तास स्वतःसाठी या विचारांची मांडणी केली.
बिनदिक्कत कामाच्या तासांमुळे मजुरांचे आरोग्य धोक्यात होते. बाबासाहेबांनी हे अन्याय थांबवायचं ठरवलं.
Factories Act 1948 अंतर्गत, बाबासाहेबांच्या प्रभावामुळे 8–9 तासांच्या मर्यादेचा कायद्यात समावेश झाला.
या कलमानुसार दिवसभरात 9 तासांपेक्षा अधिक काम करवून घेता येणार नाही; आणि त्यात 30 मिनिटांची विश्रांती अनिवार्य आहे.
या नियमानुसार, एका आठवड्यात 48 तासांपेक्षा अधिक काम कामगाराकडून करवून घेतले जाऊ शकत नाही.
नियमित वेळेपेक्षा अधिक काम केल्यास, कामगाराला अधिक मोबदला मिळावा, यासाठीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कायद्यात तरतूद केली.