Yashwant Kshirsagar
भारताच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील एक अत्यंत प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. विसाव्या शतकात त्यांचे कार्य आणि विचार प्रेरणादायी ठरले.
बाबासाहेब आंबेडकर यांची धिप्पाड शरीरयष्टी, करारी चेहरा, भेदक दृष्टी, भरदार आवाज आणि आत्मविश्वासपूर्ण धाटणी पाहून प्रत्येक भारतीय भारावून जायचा.
बाबासाहेब नेहमीच नीटनेटका पोशाख परिधान करत. त्यांचा पोशाख त्यांच्या शिस्तप्रियतेचे आणि आत्मसन्मानाचे प्रतीक होता.
आपल्या पोशाखातही बाबासाहेब नेहमी उच्च दर्जाची शिस्त राखत. त्यांचे सूट शिवणारा खास व्यक्ती कोण होता हे फारच थोड्यांना ठाऊक आहे.
बाबासाहेबांच्या राजगृहाजवळ लक्ष्मणराव शिंत्रे नावाचे गृहस्थ राहत होते. ते बाबासाहेबांचे समवयस्क व घनिष्ट मित्र होते.
लक्ष्मणरावांनी सत्यशोधक मंडळात प्रवेश घेतल्यावर बाबासाहेबांशी त्यांची ओळख झाली आणि ती ओळख पुढे गाढ मैत्रीत परिवर्तित झाली.
लक्ष्मणराव उत्तम दर्जाचे शिंपी होते. त्यांचे दुकान मुंबईच्या पानवाला चाळीत होते. बाबासाहेबांचे सर्व सूट तेच शिवायचे.
लक्ष्मणरावांच्या पत्नीचे नाव येलुबाई. रमाबाई बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठी त्या खास चोळ्या शिवायच्या.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन आणि विचार जितके प्रेरणादायी आहेत, तितकाच त्यांचा पोशाखसुद्धा आजही शिस्तीचे आणि सादरीकरणाचे प्रतीक ठरतो.