Aarti Badade
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वेगवेगळे पदार्थ खायला खूप आवडायचे त्यातलाच एक मसालेदार आणि चमचमीत ओल्या बोंबलांचा रस्सा ज्याची चव खूप रुचकर लागते.
ओले बोंबील 500 ग्रॅम, तेल 3 चमचे, लसूण 10-12 पाकळ्या, आले 1 इंच, हिरवी मिरची 2-3, कढीपत्ता 5-6 पाने, लाल तिखट 1 चमचा, हळद 1/2 चमचा, गरम मसाला 1/2 चमचा , टोमॅटो1 (बारीक चिरलेला), मीठचवीनुसार, पाणी 1 कप, कोथिंबीर बारीक चिरलेली
पाण्याने धुऊन, डोके व त्यावरची आतडी काढून बोंबील साफ करा.
लसूण, आले, हिरवी मिरची आणि कढीपत्ता बारीक वाटून ठेवा.
एका कढईत 3 चमचे तेल गरम करा.
गरम तेलात वाटलेला मसाला, लाल तिखट, हळद, गरम मसाला आणि टोमॅटोची पेस्ट घालून परतून घ्या.
त्यात मीठ व पाणी घालून एक उकळी आणा.
बोंबील घालून 5-7 मिनिटे मध्यम आचेवर शिजवा.
शेवटी कोथिंबीर आणि थोडा गरम मसाला घालून सजवा.
हा रस्सा भाकरी, चपाती किंवा भातासोबत गरमागरम सर्व्ह करा! तुम्हाला आंबटसर रस्सा आवडत असेल तर त्यात कोकम किंवा लिंबाचा रस घाला.