सकाळ डिजिटल टीम
डॉ. शरणकुमार लिंबाळे हे मराठीतील प्रसिद्ध साहित्यिक, कादंबरीकार, समीक्षक आणि दलित साहित्याचे अभ्यासक असून त्यांची १०० व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.
Sharankumar Limbale
sakal
'अक्करमाशी' या आत्मकथनासह 'दलित साहित्याचे सौंदर्यशास्त्र' ग्रंथ आणि 'हिंदू', 'सनातन', 'झुंड', 'बहुजन' व 'रामराज्य' या कादंबऱ्यांमुळे त्यांनी स्वतंत्र ठसा उमटवला आहे.
Sharankumar Limbale
sakal
त्यांच्या साहित्याचे हिंदी व इंग्रजीसह विविध भारतीय आणि परदेशी भाषांमध्ये अनुवाद झाले असून वाचनविश्वात त्यांचा मोठा प्रभाव आहे.
Sharankumar Limbale
sakal
40 हून अधिक पुस्तके लिहिणाऱ्या लिंबाळे यांना 'सनातन'साठी सरस्वती सन्मान, 'पुणे रत्न' आणि राज्य शासनाचे तीन साहित्य पुरस्कार मिळाले आहेत.
Sharankumar Limbale
sakal
सुरुवातीला टेलिफोन ऑपरेटर आणि आकाशवाणी उद्घोषक म्हणून काम करत त्यांनी एम.ए. व पीएच.डी. पूर्ण केली आणि मुक्त विद्यापीठातून प्राध्यापक व संचालक पदावरून निवृत्त झाले.
Sharankumar Limbale
sakal
आंबेडकरी विचारांची प्रेरणा घेत त्यांनी 40-45 वर्षे लेखन केले असून, ही निवड आपल्या सामाजिक लढाईचा व विचारांचा सन्मान असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
Sharankumar Limbale
sakal
संत आणि महानुभव साहित्यापासून ते दलित, ग्रामीण व स्त्रीवादी लेखकांपर्यंत सर्वांनीच समाजाच्या सुख-दुःखांशी एकनिष्ठ राहून मराठी भाषा समृद्ध केल्याचे त्यांनी नमूद केले.
Sharankumar Limbale
sakal
मूळचे अक्कलकोट तालुक्यातील हन्नूरचे असलेले लिंबाळे यांच्या निवडीमुळे सोलापूर जिल्ह्याला साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा तिसरा बहुमान मिळाला आहे.
Sharankumar Limbale
sakal
यापूर्वी 1990 मध्ये पुण्यात झालेल्या संमेलनाचे अध्यक्ष डॉ. यु. म. पठाण होते, तर 2006 मध्ये सोलापुरातील संमेलनाचे अध्यक्ष मारूती चित्तमपल्ली होते.
Sharankumar Limbale
sakal
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत शिकणाऱ्या भारतातील पहिल्या महिला वकील कोण?
First Indian Woman to Study Law at Oxford University
sakal