सकाळ डिजिटल टीम
ड्रॅगन फ्रुट या अनोख्या फळाची सुरुवात कशी झाली, जगभर त्याचा प्रसार कसा झाला या बद्दस सविस्तर माहिती जाणून घ्या.
ड्रॅगन फ्रुट मूळतः मेक्सिको, मध्य अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेतील असल्याचे सांगीतले जाते.
हे फळ १९व्या शतकात व्हिएतनाममध्ये फ्रेंच लोकांनी आणले. त्यानंतर तेथून ते इतर दक्षिण-पूर्व आशियाई देशांमध्ये लोकप्रिय झाल्याचे म्हंटले जाते.
भारतात ड्रॅगन फ्रुटची लागवड १९९० च्या दशकात सुरू झाली. सुरुवातीला ते केवळ शोभेचे रोप म्हणून आणले गेले होते.
या फळाचे आरोग्यदायी फायदे आणि आकर्षक स्वरूप लक्षात आल्यानंतर त्याची व्यावसायिक लागवड भारतात सुरू करण्यात आली.
महाराष्ट्रासह कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, गुजरात आणि आंध्रप्रदेश यांसारख्या राज्यांमध्ये या फळाची लागवड वाढत आहे.
सुरुवातीला भारतात मोठ्या प्रमाणात ड्रॅगन फ्रुट थायलंड, मलेशिया आणि व्हिएतनामसारख्या देशांमधून आयात केले जात होते. परंतु आता देशांतर्गत उत्पादन वाढल्याने आयात कमी झाली आहे.
गुजरात सरकारने या फळाला 'कमलम' (Kamalam) असे नाव दिले आहे, ज्यामुळे ते भारतात अधिक ओळखले जाऊ लागले आहे.
ड्रॅगन फ्रुटच्या लागवडीतून शेतकऱ्यांना चांगला नफा मिळत असल्यामुळे हे फळ भारतातील कृषी क्षेत्रात एक महत्त्वाचे पीक बनत आहे.