Dragon Fruit Side Effects : ड्रॅगन फ्रूट जास्त खाल्लं तर काय होतं माहितीये? 'हे' धक्कादायक दुष्परिणाम वाचा!

सकाळ डिजिटल टीम

ड्रॅगन फ्रूटचे दुष्परिणाम

ड्रॅगन फ्रूट हे पोषक तत्वांनी भरलेले, चविष्ट आणि आकर्षक दिसणारे फळ आहे. परंतु त्याचे जास्त सेवन केल्यास शरीरावर काही नकारात्मक परिणाम होऊ शकतात. चला, ड्रॅगन फ्रूट खाण्याचे तोटे जाणून घेऊया..

Dragon Fruit Side Effects | esakal

अ‍ॅलर्जीची शक्यता

काही लोकांना ड्रॅगन फ्रूटची अ‍ॅलर्जी असू शकते, ज्यामुळे त्वचेवर पुरळ उठणे, सूज येणे आणि इतर समस्या उद्भवतात.

Dragon Fruit Side Effects | esakal

पचनाच्या समस्या

ड्रॅगन फ्रूटमधील जास्त फायबरमुळे गॅस, पोटफुगी, पोटदुखी किंवा अस्वस्थता निर्माण होऊ शकते. विशेषतः जास्त प्रमाणात खाल्ल्यास हा त्रास वाढतो.

Dragon Fruit Side Effects | esakal

मधुमेहींसाठी धोकादायक

या फळात साखरेचे प्रमाण जास्त असल्याने मधुमेहाच्या रुग्णांनी याचे सेवन काळजीपूर्वक करावे, कारण रक्तातील साखरेची पातळी वाढण्याचा धोका असतो.

Dragon Fruit Side Effects | esakal

वजन वाढण्याची शक्यता

जास्त प्रमाणात ड्रॅगन फ्रूट खाल्ल्याने कॅलरीज वाढतात, ज्यामुळे वजन लवकर वाढू शकते आणि लठ्ठपणाचा धोका निर्माण होतो.

Dragon Fruit Side Effects | esakal

अतिसाराचा त्रास

ड्रॅगन फ्रूट बद्धकोष्ठता कमी करण्यास मदत करत असले, तरी जास्त प्रमाणात खाल्ल्यास मल खूप मऊ होऊन अतिसार होऊ शकतो.

Dragon Fruit Side Effects | esakal

मूत्रपिंडांवर ताण

या फळात पोटॅशियम जास्त प्रमाणात असल्याने मूत्रपिंडाच्या समस्या असलेल्या लोकांनी याचे सेवन टाळावे, कारण ते मूत्रपिंडांवर अतिरिक्त दबाव टाकू शकते.

Dragon Fruit Side Effects | esakal

औषधांचा खजिना आहे 'हे' फळ; पण वर्षातून फक्त 2 महिनेच मिळतं, साल-पानांमध्येही आहेत औषधी गुणधर्म

Indian Cherry Benefits | esakal
येथे क्लिक करा...