औषधांचा खजिना आहे 'हे' फळ; पण वर्षातून फक्त 2 महिनेच मिळतं, साल-पानांमध्येही आहेत औषधी गुणधर्म

सकाळ डिजिटल टीम

औषधांची खाण 'भोकर'

निसर्ग ही मानवासाठीची सर्वात मोठी औषधशाळा आहे. आज आपण जे विविध व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स गोळ्यांच्या स्वरूपात घेतो, तेच घटक निसर्गाने फळं, भाज्या आणि वनस्पतींमध्ये भरभरून दिले आहेत. काही फळं तर इतकी गुणकारी असतात की त्यांना ‘औषधांची खाण’ म्हणावं लागेल. असंच एक बहुगुणी फळ म्हणजे भोकर.

Indian Cherry Benefits | esakal

'भोकर’ म्हणजे काय?

भोकर फळाचं मराठीत गोंदण, हिंदीत लासोरा, संस्कृतमध्ये श्लेष्मातक आणि इंग्रजीत Indian Cherry असं नाव आहे. हे फळ आकाराने लहान सुपारीसारखं असतं. शक्तीवर्धक आणि औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असलेल्या या फळाचे उपयोग अनेक प्रकारच्या आजारांवर होतात.

Indian Cherry Benefits | esakal

भोकर झाड कुठे आढळतं?

  • भारतासह श्रीलंका, चीन, तैवान, इजिप्त आणि इंडोनेशियात याचे झाड आढळते.

  • महाराष्ट्रात हे झाड विशेषतः पश्चिम घाट, कोकण आणि सातपुडा भागात जंगलात नैसर्गिकरीत्या उगम पावते.

  • हे झाड 10 ते 12 मीटर उंचीचं असतं आणि सदापर्णी म्हणजे कायम हिरव्या पानांनी बहरलेलं असतं.

Indian Cherry Benefits | esakal

भोकर फळ कधी मिळतं?

  • या झाडाला फळं लागतात फक्त वर्षातून दोनच महिने – जुलै आणि ऑगस्ट दरम्यान.

  • सुरुवातीला फळं हिरवी असतात, पिकल्यावर ती गुलाबी किंवा तांबूस-पिवळी होतात.

  • चविला हे फळ गोडसर असतं.

Indian Cherry Benefits | esakal

भोकरचे आरोग्यदायी फायदे

  • कच्च्या फळांपासून लोणचं बनवलं जातं, काही जण त्याची पावडर करून साठवतात, तर काहींना पिकलेली फळं खाणं आवडतं.

  • भोकर फळ हे कृमिनाशक, कफोत्सारक, तसेच खोकला, कोरडा खोकला, छाती व मूत्रनलिकेचे त्रास, पित्तप्रकोप, ताप, तहान, मूत्रदाह व व्रणांवर उपयोगी आहे.

esakal | Indian Cherry Benefits

साल आणि पानांचाही आहे उपयोग!

  • भोकराच्या सालीत फुफ्फुसांचे विकार दूर करणारे गुण असतात.

  • त्वचारोग, खाज, अतिसार, मोडशी यावर साल वापरली जाते.

  • साल सौम्य शक्तिवर्धक म्हणूनही काम करते.

  • पाने डोकेदुखी आणि जखमांवर लावतात.

Indian Cherry Benefits | esakal

औषधांचं भांडारच

भोकर हे फळ म्हणजे निसर्गाची देणगी असलेलं औषधांचं भांडारच आहे. याच्या झाडाचा प्रत्येक भाग फळ, साल, पाने औषध म्हणून वापरता येतो. पण हे फळ फक्त दोन महिन्यांसाठीच उपलब्ध असतं, त्यामुळे त्याचा हंगामात जरूर लाभ घ्या!

Indian Cherry Benefits | esakal

'ही' भाजी खात असाल, तर आताच सावध व्हा; मेंदूमध्ये किडे होण्याचा आहे धोका, भाजी खाल्ल्यानंतर होतोय गंभीर संसर्ग

Tapeworm in Cabbage | esakal
येथे क्लिक करा...