बाळकृष्ण मधाळे
महाराष्ट्रासह संपूर्ण देशात अनेक बौद्ध विहार आहेत. मात्र, नागपूरजवळील कामठी येथे वसलेले ड्रॅगन पॅलेस बौद्ध मंदिर हे आपल्या अनोख्या जपानी स्थापत्यशैलीमुळे विशेष ओळखले जाते.
Dragon Palace Nagpur
esakal
नागपूर शहरापासून अवघ्या १४ किलोमीटर अंतरावर असलेले हे मंदिर जगप्रसिद्ध बौद्ध विहार म्हणून ओळखले जाते.
Dragon Palace Nagpur
esakal
जपानी स्थापत्यकलेचा सुंदर नमुना असलेले ड्रॅगन पॅलेस मंदिर अत्यंत शांत, स्वच्छ आणि मनाला प्रसन्नता देणारे आहे. या बौद्ध विहाराची रचना इतकी आकर्षक आहे की, सर्व धर्मांचे पर्यटक मोठ्या संख्येने येथे भेट देण्यासाठी येतात. देश-विदेशातील पर्यटकांसाठी हे मंदिर एक प्रमुख आकर्षण ठरले आहे.
Dragon Palace Nagpur
esakal
या बौद्ध विहारात भगवान गौतम बुद्धांची भव्य मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आली आहे. ही मूर्ती अखंड चंदनाच्या लाकडापासून तयार करण्यात आली असून तिची उंची सुमारे सहा फूट आहे. तब्बल ८६४ किलो वजनाची ही मूर्ती पाहणाऱ्यांना भारावून टाकते. पहिल्या मजल्यावर विशाल आणि शांत प्रार्थनागृह असून येथेच ही बुद्धमूर्ती स्थापित आहे.
Dragon Palace Nagpur
esakal
मंदिराच्या तळमजल्यावर वातानुकूलित सभागृह, वाचनालय तसेच फोटो गॅलरीची सुविधा उपलब्ध आहे. या ठिकाणी बौद्ध धर्म, भगवान बुद्धांचे जीवन आणि विविध ऐतिहासिक क्षणांची माहिती छायाचित्रांच्या माध्यमातून पाहायला मिळते.
Dragon Palace Nagpur
esakal
सुमारे १० एकर परिसरात पसरलेले हे भव्य ड्रॅगन पॅलेस मंदिर महाराष्ट्रातील जपानी स्थापत्यशैलीतील एकमेव धार्मिक स्थळ मानले जाते. सन १९९९ मध्ये जपानमधील ओगावा समाजाने दान केलेल्या निधीतून या मंदिराची स्थापना करण्यात आली.
Dragon Palace Nagpur
esakal
ड्रॅगन पॅलेस बौद्ध मंदिराला ‘नागपूरचे लोटस टेंपल’ असेही म्हटले जाते. कामठी परिसरात वसलेले हे मंदिर आपल्या सौंदर्य, शांतता आणि आध्यात्मिक वातावरणामुळे पर्यटकांना सतत आकर्षित करत आहे.
Dragon Palace Nagpur
esakal
Maharashtra Tourism
esakal