बाळकृष्ण मधाळे
महाराष्ट्रात एकूण ३६ जिल्हे असून प्रत्येक जिल्ह्याची स्वतःची वेगळी ओळख आणि वैशिष्ट्य आहे.
Maharashtra Tourism
esakal
सह्याद्रीच्या भव्य पर्वतरांगा, अथांग समुद्रकिनारा, हिरवीगार जंगले आणि ऐतिहासिक गड-किल्ल्यांमुळे महाराष्ट्राला देशाच्या पर्यटन राजधानीचा मान मिळतो.
Maharashtra Tourism
esakal
निसर्ग, इतिहास आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम असलेली ही राज्यातील काही प्रमुख पर्यटन स्थळे पाहायलाच हवीत.
Maharashtra Tourism
esakal
कोल्हापूरची महालक्ष्मी देवी अनेकांचे श्रद्धास्थान आहे. रंकाळा तलावामुळे हे शहर विशेष प्रसिद्ध आहे. पन्हाळा किल्ला आणि गगनबावडा हीही कोल्हापूर परिसरातील लोकप्रिय पर्यटन ठिकाणे आहेत.
Maharashtra Tourism
esakal
पुणे हे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाते. सिंहगड, शनिवारवाडा, दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर यांसारखी अनेक प्रसिद्ध पर्यटन स्थळे येथे पाहायला मिळतात.
Maharashtra Tourism
esakal
ताडोबाची जंगल सफर हा थरारक आणि अविस्मरणीय अनुभव ठरतो. चंद्रपूर जिल्ह्यातील हा प्रसिद्ध व्याघ्र प्रकल्प असून येथे प्रत्यक्ष वाघ दर्शनाची संधी मिळते. जीपमधून केली जाणारी सफारी पर्यटकांसाठी खास आकर्षण ठरते.
Maharashtra Tourism
esakal
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) हे जागतिक कीर्तीचे पर्यटन केंद्र आहे. अजिंठा-एलोरा लेणी, बीबी का मकबरा, पाणचक्की ही येथील प्रमुख आकर्षणे आहेत.
Maharashtra Tourism
esakal
कोकण किनारपट्टीवरील रत्नागिरी जिल्हा निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. गणपतीपुळे, रत्नदुर्ग किल्ला, आरे-वारे बीच, दापोली, श्रीवर्धन आणि गुहागर हे सुंदर समुद्रकिनारे पर्यटकांना भुरळ घालतात.
Maharashtra Tourism
esakal
सातारा जिल्ह्यातील कास पठार हे ‘फुलांचे पठार’ म्हणून ओळखले जाते आणि पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. याशिवाय कोयना धरण, कोयना अभयारण्य आणि अजिंक्यतारा किल्ला येथे मोठ्या संख्येने पर्यटक भेट देतात.
Maharashtra Tourism
esakal
महाबळेश्वरला महाराष्ट्राचे ‘मिनी काश्मीर’ म्हणून ओळखले जाते. येथील आल्हाददायक हवामान आणि निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी देशभरातून पर्यटक येतात.
Maharashtra Tourism
esakal
नाशिकला महाराष्ट्राची देवभूमी म्हटले जाते. त्र्यंबकेश्वर, पंचवटी यांसारखी अनेक प्रसिद्ध तीर्थक्षेत्रे येथे आहेत.
Maharashtra Tourism
esakal
माथेरान हे महाराष्ट्रातील सर्वात छोटे आणि प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. मुंबई आणि पुण्याच्या जवळ असल्याने विकेंडला येथे पर्यटकांची मोठी गर्दी असते. निसर्ग, इतिहास आणि अध्यात्माचा अनुभव एकाच ठिकाणी घ्यायचा असेल, तर ही महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे आयुष्यात एकदा तरी नक्की भेट द्या.
Maharashtra Tourism
esakal
Taj Mahal Old Name
esakal