सकाळ डिजिटल टीम
एखाद्या काल्पनिक चित्रपटातून बाहेर आल्यासारखा दिसणारा हा साप सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. याचे नाव 'ड्रॅगन स्नेक' असे आहे.
The Dragon Snake
sakal
या सापाच्या पाठीवर उंच आणि ओबड-धोबड खवले असतात. हे खवले पौराणिक कथेतील ड्रॅगनच्या पाठीवरील काट्यांसारखे दिसतात.
The Dragon Snake
sakal
हा दुर्मिळ साप आग्नेय आशियातील इंडोनेशिया, थायलंड आणि मलेशियाच्या दलदलीच्या भागात, शेतात आणि दाट जंगलात आढळतो.
The Dragon Snake
sakal
हा साप साधारण २ ते ३ फूट लांब असतो. याचे मोठे काळे डोळे आणि बारीक शरीर यामुळे तो अधिक गूढ आणि वेगळा दिसतो.
The Dragon Snake
sakal
ड्रॅगन स्नेक निशाचर असून दिवसा पानांखाली किंवा जमिनीत लपतो. बेडूक, टॅडपोल आणि छोटे मासे हे त्याचे मुख्य अन्न आहे.
The Dragon Snake
sakal
शत्रू किंवा धोका दिसताच हा साप आपले शरीर एकदम कडक करतो आणि एकाच जागेवर गोठल्यासारखा शांत राहतो. हा त्याचा बचावाचा मार्ग आहे.
The Dragon Snake
sakal
हा साप घरात किंवा पेट म्हणून जगू शकत नाही. निसर्गाच्या मोकळ्या वातावरणाबाहेर हा साप जास्त काळ जिवंत राहत नाही.
The Dragon Snake
sakal
World Lion Day: सिंह दिवसभर काय करतो?
The King of the Jungle
sakal