Yashwant Kshirsagar
द्रौपदी महाभारतात पाच पांडवांची पत्नी होती. द्रोपद राजाची कन्या होती आणि अर्जुनाने माशाचा डोळा फोडून तिला जिंकले होते.
पण पाचही पांडवांनी आई कुंतीच्या आदेशानुसार द्रौपदीचा पत्नी म्हणून स्वीकार केला होता. द्रौपदीचा विवाह युद्धिष्ठिर, भीम, अर्जुन, नकूल, आणि सहदेव या पाच पांडवांशी झाला.
पाच पांडवांपैकी द्रौपदीवर कुणाचे जास्त प्रेम होते असा प्रश्न आला की लोक नेहमी अर्जुनाचे नाव घेतात
पण हे खरं नाही, चला तर मग पाच पांडवांपैंकी द्रौपदीवर सर्वात जास्त प्रेम कोण करत होते आणि तिचेही कुणावर जास्त प्रेम होते हे जाणून घेऊया.
भीम द्रौपदी वर सर्वात जास्त प्रेम करत होता. तो कधीही द्रौपदीला कधीही दु:खी पाहू शकत नव्हता.
असं सांगितलं जातं की, वनवासादरम्यान द्रौपदीला चालण्याचा त्रास होऊ नये म्हणून भीम तिला आपल्या खांद्यावर बसवून चालत असे.
पांडव अज्ञातवासात होते तेव्हा द्रौपदीला एका राणीची दासी व्हावे लागले होते. त्यावेळी भीम खूप दु:खी झाला होता.
असं म्हटलं जातं की, पुढील जन्मी पती म्हणून भीमच लाभावा अशी द्रौपदीने मृत्यूआधी शेवटची इच्छा व्यक्त केली होती.
हा लेख इंटरनेटवरील माहिती आधारे लिहिण्यात आला आहे. सकाळ याची पुष्टी करत नाही.