बाळकृष्ण मधाळे
झोपेत पडणाऱ्या स्वप्नांवर आपले नियंत्रण नसते. धार्मिक आणि लोकश्रद्धांनुसार स्वप्नात दिसणाऱ्या कावळ्याचे विविध अर्थ सांगितले जातात. जाणून घेऊया काही प्रचलित मान्यता.
Crow in Dream Meaning
esakal
आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या व्यक्तीला स्वप्नात कावळा पूर्वेकडून पश्चिमेकडे उडताना दिसला, तर ते शुभ मानले जाते. याचा संबंध आर्थिक लाभाशी जोडला जातो.
Crow in Dream Meaning
esakal
विद्यार्थ्याला स्वप्नात कावळा दही किंवा लोणी खाताना दिसला, तर ते शुभ मानले जाते. लोकश्रद्धेनुसार, हे परीक्षा आणि स्पर्धेत यश मिळण्याचे संकेत मानले जातात.
Crow in Dream Meaning
esakal
स्वप्नात कावळा जाळ्यात अडकलेला आणि नंतर त्यातून मुक्त होऊन उडताना दिसला, तर हे शुभ मानले जाते. याचा अर्थ अडचणींवर मात करणे आणि विरोधकांवर विजय असा लावला जातो.
Crow in Dream Meaning
esakal
स्वप्नात कावळ्यांची झुंड उडताना दिसणे आणि त्यातील कावळ्याने जवळ येऊन फळ टाकणे शुभ मानले जाते. लोकश्रद्धेनुसार, हे धनलाभ किंवा संततीसंबंधी संकेत असू शकतात.
Crow in Dream Meaning
esakal
रात्रीच्या पहिल्या प्रहरात व्यवसायाच्या ठिकाणच्या छतावर कावळा बसलेला दिसल्यास, व्यापार-व्यवसायात यश मिळण्याचा संकेत मानला जातो.
Crow in Dream Meaning
esakal
अविवाहित तरुण किंवा तरुणीला स्वप्नात घराच्या मागील बाजूस कावळा बसलेला दिसल्यास, लवकर विवाह होण्याचा संकेत असल्याची लोकश्रद्धा आहे.
Crow in Dream Meaning
esakal
कावळा दूध पिताना दिसणे हे विवाहित व्यक्तीसाठी संततीसंबंधी शुभ संकेत मानले जाते. दही खाताना कावळा दिसणे रोजगार किंवा आरोग्य सुधारण्याशी, तर लोणी खाताना दिसणे आर्थिक लाभाशी जोडले जाते.
Crow in Dream Meaning
स्वप्नातील कावळ्याबाबत सांगितले जाणारे हे अर्थ धार्मिक आणि लोकश्रद्धांवर आधारित आहेत. याला कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. ही माहिती केवळ सामान्य जनहिताच्या दृष्टीने दिली आहे.
Crow in Dream Meaning
esakal
Dead Crow and Pitrudosh Beliefs
esakal