Sandeep Shirguppe
पावसाळ्यात गरम पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत. पोटाच्या आजारांपासून बचाव होतो.
गरम पाणी आतड्यांची हालचाल सुधारते आणि बद्धकोष्ठता कमी करण्यास मदत करते.
घसा खवखवणे आणि सर्दी-खोकल्याचा त्रास होत असेल तर गरम पाणी प्यावे.
शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी गरम पाणी मदत करते.
गरम पाणी रक्तवाहिन्या शिथिल करते, ज्यामुळे रक्ताभिसरण सुधारते.
चयापचय क्रिया वाढवण्याचे काम गरम पाणी करते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
गरम पाणी प्यायल्याने शरीराला आराम मिळतो आणि तणाव कमी होतो.
पावसाळ्यात थंड वातावरणात गरम पाणी प्यायल्याने शरीर उबदार राहते.