Anushka Tapshalkar
दररोज लिंबू पाणी आणि काळे मीठ पिणे आरोग्यासाठी अंत्यत फायदेशीर आहे.
यात व्हिटॅमिन C, अँटिऑक्सिडंट्स आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात.
लिंबामधील भरपूर व्हिटॅमिन C, तसेच काळ्या मीठातील पोटॅशियम, सोडियम रोगप्रतिकारक शक्ती वाढवून संसर्गाशी लढण्यास मदत करते, सर्दी-ताप टाळते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकते आणि शरीराला गरजेची असलेली ऊर्जा टिकवून ठेवते.
काळ्या मीठासह लिंबू पाणी कमी कॅलरीयुक्त असल्याने वजन कमी करण्यास मदत होते. हे शरीरातील मेटाबॉलिझम वाढवते, भूक नियंत्रित ठेवते आणि चरबी जळण्यास मदत करते.
लिंबातील अँटीऑक्सिडंट्स त्वचेचे आरोग्य सुधारून नैसर्गिक चमक देतात, सुरकुत्या कमी करून वृद्धत्वाची लक्षणे दूर ठेवतात आणि त्वचेला हायड्रेटेड ठेवतात.
लिंबू आणि काळ्या मिठात असलेले व्हिटॅमिन C तणाव कमी करून आनंदी हार्मोन्स वाढवते. हे मानसिक आरोग्यास मदत करते आणि संपूर्ण शरीरातील हार्मोन्सचे संतुलन राखते.
लिंबू पाण्यात काळे मीठ घालून पिल्याने शरीर हायड्रेटेड राहते, ज्यामुळे ऊर्जा मिळते आणि पचनसंस्था मजबूत होते.
लिंबातील सिट्रिक अॅसिड किडनी स्टोनचा धोका कमी करून लघवीचे pH स्तर संतुलित ठेवते आणि विषारी घटक बाहेर टाकून किडनीचे आरोग्य सुधारते.
लिंबू पाणी आणि काळे मीठ यामधील अँटीऑक्सिडंट्स पेशींना फ्री रॅडिकल्सच्या हानीपासून संरक्षण देऊन लिव्हर डिटॉक्स करण्यात मदत करतात आणि कर्करोगाचा धोका कमी करतात.
दररोज लिंबू पाणी आणि काळे मीठ प्यायल्याने शरीर तंदुरुस्त राहते आणि अनेक आजारांपासून बचाव करता येतो.
काळ्या मीठातील खनिजे पचनसंस्था सुधारून आवश्यक एंझाइम्स सक्रिय करतात, अॅसिडिटी, ब्लोटिंग आणि गॅससारख्या समस्यांवर नियंत्रण ठेवतात, मात्र त्याचे प्रमाणात सेवन करणे आवश्यक आहे.