Anushka Tapshalkar
मूत्रमार्गात इन्फेक्शन होणं म्हणजेच युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (UTI). महिलांमध्ये ही समस्या जास्त प्रमाणात आढळते.
UTI होण्यामागे काही ठराविक कारणं आहेत. बॅक्टेरिया मूत्रमार्गात प्रवेश करतात आणि तिथे वाढतात. स्वच्छतेअभावी, लैंगिक संबंधानंतर किंवा लघवी रोखल्यामुळे याचा धोका वाढतो.
परंतु पुढे दिल्याप्रमाणे योग्य काळजी घेतली तर UTI होण्यापासून तुम्ही स्वत:चा बचाव करू शकता.
शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकण्यासाठी आणि मूत्रमार्ग स्वच्छ ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिणं आवश्यक आहे.
लघवी रोखल्याने बॅक्टेरिया वाढतात व इन्फेक्शनचा धोका वाढतो. त्यामुळे लघवी रोखू नका. तसेच प्रवासात टॉयलेट सीट सॅनिटायझर व वाइप्स वापरा.
जननेंद्रिय स्वच्छ ठेवणे, योग्य प्रकारे स्वच्छता राखणे UTI टाळण्यासाठी महत्त्वाचे आहे.
कॉटनचे अंतर्वस्त्र हवेशीर असतात आणि बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करतात.
सुरक्षित लैंगिक संबंध ठेवल्यास इन्फेक्शनचा धोका कमी होतो.
जळजळ, वारंवार लघवी लागणे, दुर्गंधी ही लक्षणं दिसल्यास उपचार घेणे आवश्यक आहे.