Sandeep Shirguppe
पिंपळाच्या पानांचा काढ्याला आयुर्वेदात महत्व आहे. याने अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात.
पिंपळाच्या पानांमध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ, अँटीव्हायरल आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात.
त्वचा आणि संपूर्ण शरीराशी संबंधित समस्या कमी करण्यास मदत पिंपळाची पाने करतात.
पिंपळाच्या पानांचा काढा पचनसंस्था सुधारण्यासाठी, साखर नियंत्रित करण्यासाठी होतो.
सर्दी, खोकला आणि ब्राँकायटिस सारख्या समस्या असतील तर पिंपळाच्या पानांचा काढा प्यावा.
गॅस किंवा बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या असतील तर पिंपळाच्या पानांचा काढा पिल्यास फायदा होतो.
पिंपळाच्या पानांमध्ये साखर नियंत्रित करणारे घटक असतात. यामुळे साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते.
चेहऱ्यावर असलेले डाग, मुरुम आणि त्वचेचे संक्रमण कमी करण्यासाठी पिंपळाच्या पानांचा काढा प्यावा.