पुजा बोनकिले
गणपती बाप्पाला अर्पण करण्यासाठी काही खास गोष्टींची निवड केली जाते.
ज्या शास्त्रानुसार आणि परंपरेनुसार महत्त्वाच्या मानल्या जातात.
गणपतीला दुर्वा अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. विशेषतः २१ दुर्वा किंवा त्याची जोडी अर्पण करावी. दुर्वा समृद्धी आणि शांतीचे प्रतीक आहे.
गणपतीला मोदक अतिप्रिय आहेत. उकडीचे मोदक, तळलेले मोदक किंवा लाडू अर्पण केले जातात. हे त्यांचे आवडते भोग मानले जाते.
ताज्या फुलांचा हार किंवा लाल फुले (जास्वंद, कमळ, गुलाब) अर्पण करावीत. गणपतीला लाल रंगाची फुले विशेष प्रिय आहेत.
दूध, दही, तूप, मध आणि साखर यांचे मिश्रण असलेले पंचामृत अर्पण करावे.
सुपारी, पान आणि खडीसाखर यांचा समावेश असलेला तांबूल अर्पण करावा.
यंदा संकष्टी चतुर्थी १४ जुलै रोजी साजरी केली जाणार आहे.
बाप्पाचा आशीर्वाद हवा असेल तर संकष्टी चतुर्थीला या गोष्टी अर्पण कराव्यात.