Sandeep Shirguppe
भिजवलेल्या सब्जा बियांचा आरोग्यासाठी खूप उपयोग होतो! पाणी, सब्जा यांचे मिश्रण म्हणजे नैसर्गिक शक्तिवर्धक पेय होय.
सब्जा बिया शरीरातील उष्णता कमी करून थंडावा देतात. उन्हाळ्यात याचा फार उपयोग होतो.
सब्जा बियातील फायबर्समुळे पचन सुधारते, बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.
या बियांचे सेवन केल्याने पोट भरल्यासारखे राहते. यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.
डायबेटीस असणाऱ्यांणी रोज एक पेलाभर सब्जा बी घातलेले पाणी प्यावे रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते.
यात अँटीऑक्सिडंट्स असतात, जे त्वचा निरोगी ठेवतात आणि केस गळती कमी करतात.
पोटात गॅस, अॅसिडिटी असेल तर भिजवलेल्या सब्जा बियांनी लगेच आराम मिळतो.
शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकण्यासाठी हे एक नैसर्गिक उपाय आहे.