Aarti Badade
१ चमचा जिरे रात्री पाण्यात भिजवा आणि सकाळी ते पाणी रिकाम्या पोटी प्यायल्यास आरोग्यदायी फायदे मिळतात.
जिरे चयापचय वाढवते, त्यामुळे कॅलरीज जास्त बर्न होतात आणि वजन कमी होण्यास मदत होते.
जिरे आतड्यांतील एन्झाईम्स सक्रिय करून अन्न पचण्याची प्रक्रिया सुलभ करते.
जिरे पाणी घेतल्याने पोट फुगणे, अॅसिडिटी व अपचन यांसारखे त्रास कमी होतात.
जिऱ्यामध्ये असलेली जीवनसत्त्वे त्वचेचा नूर टिकवून ठेवतात आणि त्वचेला नैसर्गिक चमक देतात.
जिरे पाणी कोलेस्टेरॉलची पातळी आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास सहाय्यक ठरते.
ही माहिती सामान्य आहे. जिरे पाणी नियमित सुरू करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या.