Aarti Badade
जांभळाचा काढा किंवा व्हिनेगर यकृतासाठी ठरतो अमृततुल्य!
जांभूळ हे गोड-आंबट चव असलेले फळ असून त्याचे औषधी गुणधर्म आयुर्वेदात मान्य आहेत. रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि शरीर शुद्ध करते.
जांभळापासून तयार केलेला व्हिनेगर यकृत वाढणे, प्लीहा वाढणे, जलोदर यांसारख्या आजारांवर फायदेशीर ठरतो.
५–७ ग्रॅम कोवळी जांभळाची पाने २ ग्लास पाण्यात उकळा. अर्धा ग्लास पाणी राहिल्यावर गाळा व सकाळ-संध्याकाळ प्यावा.
जांभळाच्या बिया आणि सालीपासूनही औषधी उपयोग होतो. बियांची पूड मधुमेह आणि पचनाच्या तक्रारींवर उपयोगी.
जास्त जांभूळ खाल्ल्यास पोट बिघडू शकते. म्हणून मोजकेच सेवन करा. विशेषतः रिकाम्या पोटी व्हिनेगर किंवा काढा पिणे योग्य.
दररोज जांभळाचा काढा पिल्याने यकृताची ताकद वाढते. आयुर्वेदतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली याचा वापर करा.