Aarti Badade
दररोज सकाळी रिकाम्या पोटी तुळशीचे पाणी पिल्याने अनेक आरोग्य फायदे होतात.
सकाळी रिकाम्या पोटी तुळशीचे पाणी पिल्याने यकृत आणि मूत्रपिंड विषमुक्त होण्यास मदत होते.
रात्री झोपण्यापूर्वी तुळशीचे पाणी पिल्याने शरीराचे कार्य सुरळीत होते.
तुळशीमध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरल आणि अँटीफंगल गुणधर्म आढळतात. रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि संसर्गाचा धोकाही कमी होतो.
तुळशीचे पाणी पोटफुगी, गॅस, आम्लपित्त आणि अपचनासाठी खूप फायदेशीर आहे.
तुळशीचे पाणी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यात मदत करते. इन्सुलिन संवेदनशीलता सुधारते आणि साखरेची पातळी वाढू देत नाही.
दररोज तुळशीचे पाणी पिल्याने त्वचा चमकदार होते आणि रक्त शुद्ध होते.
तुळशीचे पाणी चयापचय वाढवते, बाहेरच्या गोष्टीं खाण्याची इच्छा कमी करते आणि शरीरावरची चरबी कमी करण्यास मदत करते.