Monika Shinde
भारतीय स्वयंपाकघरात बडीशेप मसाल्याच्या रूपात वापरली जाते, पण बडीशेपचे दूध आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.
दुधात बडीशेप मिसळून प्यायल्याने शरीराला विविध फायदे होतात. चला तर जाणून घेऊया कोणते आहेत ते फायदे
बडीशेप थोड तव्यावर भाजून घेऊन त्याची बारीक पावडर करून ठेवा. मग रोज दुधात १ चमचा बडीशेप पावडर घालून प्या
रात्री १ ग्लास दुधात बडीशेप पावडर घालून प्यायल्याने पचन सुधारते. बडीशेपात अँटीऑक्सिडंट्स असतात, जे पचन क्रिया सुधारण्यास मदत करते.
दुधामध्ये ट्रायप्टोफैन असतो, जे की झोप वाढवण्यास मदत करतो. ज्यामुळे झोपे संबंधित समस्या दूर होतात. आणि शांत झोप लागते.
बडीशेपमध्ये फॅट बर्निंग गुणधर्म असतात, ज्यामुळे दुधासोबत त्याचे सेवन केल्याने वजन कमी करण्यास मदत होऊ शकते.
बडीशोपामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात जे त्वचेला स्वच्छ ठेवतात. दुधासोबत त्याचे सेवन केल्याने त्वचेवर चमक आणू शकते आणि त्वचेला हायड्रेटेड ठेवते.
बडीशेपचे दूध महिलांसाठी अत्यंत फायदेशीर आहे, कारण ते हार्मोनल संतुलन राखण्यास मदत करते आणि मासिक पाळीच्या समस्यांवर नियंत्रण ठेवते.