Saisimran Ghashi
शरीरात पाण्याचे अतिसेवन वॉटर इंटोक्सिया निर्माण करू शकते.
जास्त पाणी प्यायल्याने रक्तातील मीठाचे प्रमाण कमी होते, याला हायपोनेट्रेमिया म्हणतात.
अतिरिक्त पाण्यामुळे शरीरातील पेशींमध्ये पाणी जाते व त्या फुगतात, विशेषतः मेंदूतील पेशी.
मेंदूतील पेशी फुगल्यामुळे डोकेदुखी, भ्रम आणि झटके येऊ शकतात.
जास्त पाणी प्यायल्याने उलट्या, चक्कर, स्नायूंचा कमकुवतपणा आणि थकवा होऊ शकतो.
पाण्याचा अतिरेक झाल्यास श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.
मूत्रपिंड दर तासाला ०.८ ते १ लिटर पाणी प्रक्रिया करू शकतात, त्याहून अधिक पाणी एकाच वेळी पिणे टाळावे.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.