Saisimran Ghashi
छातीत वारंवार जडपणा, दडपण किंवा सौम्य वेदना जाणवणे हे सुरुवातीचे लक्षण असू शकते.
थोड्या हालचालीतही दम लागणे किंवा श्वास घ्यायला अडचण होणे हे हृदयाची कार्यक्षमता कमी झाल्याचे संकेत असतात.
साध्या कामांमध्येही थकवा येणे, दिवसभर थकवा जाणवणे हे विशेषतः महिलांमध्ये दिसणारे लक्षण आहे.
विश्रांतीच्या अवस्थेत थंड, चिकट घाम येणे हे हृदयावर ताण येत असल्याचे लक्षण असते.
झोपेत वारंवार जाग येणे, अस्वस्थता जाणवणे किंवा विचित्र स्वप्ने पडणे ही हृदयविकाराची लपलेली लक्षणे असू शकतात.
हृदयाचे ठोके अनियमित होणे किंवा धडधड वाढणे हे हृदयातील विजेच्या प्रवाहातील गडबडीचे संकेत असतात.
मळमळ, अपचन, पोटात दुखणे ही लक्षणे गॅससारखी वाटली तरी ती हृदयविकाराची पूर्वलक्षणे असू शकतात.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.