झोपण्यापूर्वी पाणी पिल्याने शरीरावर काय परिणाम होतात?

Aarti Badade

वेळेचे महत्त्व

पाणी शरीरासाठी अमृत असले तरी ते योग्य वेळी पिणे महत्त्वाचे आहे. रात्री झोपण्यापूर्वी पाणी पिण्याचे जसे फायदे आहेत, तसेच काही तोटेही असू शकतात.

Drinking water at night

|

Sakal

कोमट पाण्याचे फायदे

रात्री झोपण्यापूर्वी थोडे कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील रक्ताभिसरण (Blood Circulation) सुधारते. तसेच शरीरातील विषारी घटक (Toxins) बाहेर पडण्यास मदत होते.

Drinking water at night

|

Sakal

शरीराचे तापमान आणि झोप

जर तुम्हाला रात्री खूप उष्णता जाणवत असेल, तर थोडे पाणी प्यायल्याने शरीराचे तापमान संतुलित राहते. यामुळे मन शांत होऊन चांगली झोप लागण्यास मदत होते.

Drinking water at night

|

sakal

झोपेत येणारे अडथळे

रात्री जास्त पाणी प्यायल्याने वारंवार लघवीसाठी उठावे लागते. यामुळे झोप पूर्ण होत नाही, ज्याचा परिणाम दुसऱ्या दिवशी डोकेदुखी, चिडचिडेपणा आणि थकव्यावर होतो.

Drinking water at night

|

Sakal

पचनाच्या समस्या

झोपण्यापूर्वी लगेच जास्त पाणी प्यायल्याने काही लोकांना ॲसिडिटी किंवा ॲसिड रिफ्लक्सचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे पचनाच्या तक्रारी वाढण्याची शक्यता असते.

Drinking water at night

|

Sakal

पाणी पिण्याची योग्य वेळ

रात्रीचा त्रास टाळण्यासाठी झोपण्याच्या साधारण १ ते २ तास आधी भरपूर पाणी प्यावे. यामुळे शरीराला आवश्यक हायड्रेशन मिळते आणि रात्रीची झोपही मोडत नाही.

Drinking water at night

|

Sakal

फक्त अर्धा ग्लास पुरेसा!

जर तुम्हाला रात्री झोपताना तहान लागलीच, तर खूप जास्त पाणी पिण्याऐवजी फक्त अर्धा ग्लास किंवा काही घोट पाणी प्या. यामुळे घसा कोरडा पडणार नाही आणि झोपही डिस्टर्ब होणार नाही.

Drinking water at night

|

Sakal

आरोग्याची काळजी घ्या!

तुमच्या शरीराची गरज ओळखून पाण्याची वेळ ठरवा. निरोगी राहण्यासाठी दिवसा भरपूर पाणी प्या आणि रात्री मर्यादित प्रमाणात सेवन करा.

Drinking water at night

|

Sakal

पपई खाणे 'या' महिलांसाठी ठरू शकते धोकादायक!

Who should not eat papaya

|

Sakal

येथे क्लिक करा