पपई खाणे 'या' महिलांसाठी ठरू शकते धोकादायक!

Aarti Badade

पोषक तत्वांनी समृद्ध पपई

पपई हे जीवनसत्त्वे आणि फायबरने भरपूर असलेले फळ आहे. ते पचन सुधारण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते.

Who should not eat papaya

|

Sakal

कोणासाठी ठरू शकते 'पॉइझन'?

पपई आरोग्यासाठी चांगली असली, तरी काही विशिष्ट परिस्थितींमध्ये महिलांनी याचे सेवन करणे टाळले पाहिजे. चुकीच्या वेळी पपई खाल्ल्याने आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.

Who should not eat papaya

|

Sakal

गरोदर महिलांनी सावध राहावे

गरोदरपणाच्या सुरुवातीच्या महिन्यांमध्ये महिलांनी पपई खाणे टाळावे. कच्च्या किंवा अर्धवट पिकलेल्या पपईमध्ये 'लेटेक्स' असते, ज्यामुळे गर्भाशयाचे आकुंचन होऊ शकते.

Who should not eat papaya

|

Sakal

गर्भपाताचा धोका

वारंवार गर्भपाताचा त्रास झाला आहे, त्यांनी पपईपासून लांब राहावे. यातील 'पेपेन' घटक गर्भाच्या विकासावर परिणाम करू शकतो, डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय पपई खाऊ नये.

Who should not eat papaya

|

Sakal

पचन सुधारते पण...

पपई पचनासाठी उत्तम असली तरी गरोदरपणात ती हानीकारक ठरू शकते. पिकलेली पपई मर्यादित प्रमाणात चालू शकते, डॉक्टर हिरवा कंदील दाखवत नाहीत, तोपर्यंत खाऊ नका.

Who should not eat papaya

|

Sakal

'लेटेक्स' ॲलर्जी असल्यास टाळा

ज्या महिलांना लेटेक्सची ॲलर्जी आहे, त्यांना पपई खाल्ल्याने अंगावर पित्त, सूज किंवा श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. अशा महिलांनी पपईचे सेवन करताना विशेष काळजी घ्यावी.

Who should not eat papaya

|

Sakal

तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा

पपईचे अनेक फायदे असले तरी, गरोदरपण किंवा आरोग्याच्या कोणत्याही विशेष स्थितीत आहारतज्ज्ञांचा सल्ला घेणे नेहमीच सुरक्षित असते. स्वत:च्या आरोग्याशी तडजोड करू नका.

Who should not eat papaya

|

sakal

खराब कोलेस्ट्रॉल साचलंय? ‘हे’ ३ सुपरफूड्स करतील स्वच्छता; हृदय राहील फिट!

Bad cholesterol treatment

|

Sakal

येथे क्लिक करा