Sandip Kapde
पुणे आणि रायगड जिल्ह्याच्या सीमेवर वसलेले हे छोटंसं गाव डोंगररांगांच्या कुशीत निसर्गाच्या सान्निध्यात आहे.
Dapsare Village on the Pune-Raigad Border
esakal
अवघ्या २० घरांची वस्ती असलेल्या या गावात शांतता आणि निसर्गरम्य वातावरण अनुभवायला मिळते.
Dapsare Village on the Pune-Raigad Border
esakal
गावात प्रवेश करताच केळीच्या बागा, हिरवीगार झाडे आणि डोंगररांगांनी वेढलेला परिसर लक्ष वेधून घेतो.
Dapsare Village on the Pune-Raigad Border
esakal
गावाच्या शेजारी असलेली प्राचीन देवराई या परिसराचे मोठे वैशिष्ट्य असून तिथे आजही निसर्गाचा अनमोल ठेवा जपला गेला आहे.
Dapsare Village on the Pune-Raigad Border
esakal
या देवराईमध्ये अनेक दुर्मीळ वनस्पती असून विविध प्रकारचे पशू-पक्षी आणि वन्यजीवांचा अधिवास पाहायला मिळतो.
देवराईच्या परिसरात पुरातन मंदिराचे अवशेष, तीन शिवपिंडी आणि काही भग्न मूर्ती आजही इतिहासाच्या खुणा जपत उभ्या आहेत.
Dapsare Village on the Pune-Raigad Border
esakal
या परिसराला पूर्वी शंभूची पेठ म्हणून ओळखले जात असल्याचे सांगितले जाते, तसेच येथे शिवकालीन बाजारपेठ असल्याचे ऐतिहासिक संदर्भही आढळतात.
Dapsare Village on the Pune-Raigad Border
esakal
गावात प्रवेश करण्यापूर्वी रस्त्याच्या कडेला एक प्राचीन पाण्याचे कुंड पाहायला मिळते, जे या गावाचे खास आकर्षण आहे.
Dapsare Village on the Pune-Raigad Border
esakal
या कुंडातील पाणी बाराही महिने उपलब्ध असते आणि उन्हाळ्यातही ते आटत नसल्याचे स्थानिकांकडून सांगितले जाते.
Dapsare Village on the Pune-Raigad Border
esakal
या कुंडातून छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्यासाठी रायगडावर पिण्याचे पाणी नेले जात असल्याची ऐतिहासिक आख्यायिका प्रचलित आहे.
Dapsare Village on the Pune-Raigad Border
esakal
गावातील बहुतांश घरे सध्या बंद अवस्थेत असून अनेक कुटुंबे स्थलांतरित झाली आहेत, तर गावात प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिक वास्तव्यास आहेत.
Dapsare Village on the Pune-Raigad Border
esakal
सुट्ट्यांच्या काळात शहरातून गावी येणाऱ्या मुलांमुळे गाव पुन्हा गजबजते, मात्र सुट्ट्या संपल्यानंतर पुन्हा शांतता पसरते, असे दापसरे गावात पाहायला मिळते.
Dapsare Village on the Pune-Raigad Border
esakal
Historic Shivkalin Wada of Ranu Akka
esakal