Sandip Kapde
सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात वसलेले ऐतिहासिक गाव पुण्यापासून ८६ किलोमीटर, तर सातारा शहरापासून अवघ्या २५ किलोमीटर अंतरावर आहे.
कृष्णा नदीच्या विस्तीर्ण काठावर वसलेल्या या गावाचे नैसर्गिक सौंदर्य मनाला भुरळ घालणारे आहे.
Historic Shivkalin Wada of Ranu Akka
esakal
गावात प्रवेश करताच साडेतीनशे ते चारशे वर्षांपूर्वीची यादवकालीन स्थापत्यशैलीची झलक दाखवणारी रायाजीराव जाधवराव यांची भव्य समाधी पाहायला मिळते.
Historic Shivkalin Wada of Ranu Akka
esakal
या समाधीवर हत्ती, पक्षी, प्राणी, युद्धप्रसंग, गणेशमूर्ती आणि विविध नक्षीकाम केलेली सुंदर शिल्पे पाहायला मिळतात.
Historic Shivkalin Wada of Ranu Akka
esakal
समाधीच्या आतील भागात असलेल्या शिवपिंडीची गेल्या साडेतीनशे वर्षांपासून नियमित पूजा केली जात आहे.
Historic Shivkalin Wada of Ranu Akka
esakal
गावात प्राचीन हनुमान मंदिर, श्रीरामचंद्र मंदिर आणि कृष्णा नदीच्या काठावर वसलेले महालक्ष्मी मंदिर आहे.
Historic Shivkalin Wada of Ranu Akka
esakal
महालक्ष्मी मंदिराच्या परिसरात अनेक वीरगळ, दीपमाळा आणि प्राचीन मूर्ती पाहायला मिळतात, ज्या गावाचा ऐतिहासिक वारसा सांगतात.
Historic Shivkalin Wada of Ranu Akka
esakal
गावातील जुन्या वास्तूंमध्ये आचार्य भृगू ऋषींची समाधी, समाधी मठ आणि दत्त मंदिराजवळील स्वयंभू शिवलिंग विशेष लक्ष वेधून घेतात.
Historic Shivkalin Wada of Ranu Akka
esakal
गावातील सर्वांत महत्त्वाची ऐतिहासिक वास्तू म्हणजे शिवकालीन जाधवराव घराण्याचा जुना वाडा, ज्याचे मूळ लाकडी बांधकाम आणि भिंती आजही सुस्थितीत आहेत.
Historic Shivkalin Wada of Ranu Akka
esakal
काळाच्या ओघात वाड्याच्या छतावरील जुनी कौले बदलून पत्रे बसवण्यात आले असले, तरी जाधवराव कुटुंबीयांनी वाड्याचे मूळ स्वरूप जपले आहे.
Historic Shivkalin Wada of Ranu Akka
esakal
जाधवराव घराण्याचे वंशज आजही या वाड्यात वास्तव्य करत असून त्यांनी अनेक शतकांचा ऐतिहासिक ठेवा जतन करून ठेवला आहे.
Historic Shivkalin Wada of Ranu Akka
esakal
कृष्णा नदीचा निसर्गरम्य किनारा, प्राचीन मंदिरे, ऐतिहासिक समाध्या आणि शिवकालीन वास्तूंचा अनमोल वारसा जपणारे हे गाव म्हणजे सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील भुईंज गाव.
Historic Shivkalin Wada of Ranu Akka
esakal
A Village That Becomes Empty After Sunset
esakal